अखेर न्यायालयात हजर झाल्या आमदार प्रणिती शिंदे 

शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या गुरुवारी सोलापूर न्यायालयात हजर झाल्या. त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत अंतरीम जामीन मिळाला आहे. त्यांना न्यायालयात हजर होण्याबाबत जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले होते.
Praniti Shinde Congress Solapur
Praniti Shinde Congress Solapur

सोलापूर : शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या गुरुवारी सोलापूर न्यायालयात हजर झाल्या. त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत अंतरीम जामीन मिळाला आहे. त्यांना न्यायालयात हजर होण्याबाबत जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले होते. 

या प्रकरणात माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करीम शेख आदींना याअधीच जामीन मिळाला आहे. 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी वेळी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला होता. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्‍काबुक्की केली होती. या प्रकरणात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण आणल्याचा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. 

या प्रकरणात सर्व संशयित आरोपी 26 ऑगस्ट रोजी न्यायालयामध्ये हजर झाले होते. न्यायालयाने सुरवातीस सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दोन दिवसांकरिता अंतरिम जामीन दिला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना जामीन मिळाला आहे. तर आमदार प्रणिती शिंदे आणि गटनेते चेतन नरोटे यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. गुरुवारी आमदार प्रणिती शिंदे न्यायालयात हजर झाल्या. त्यांना 9 सप्टेंबरपर्यंन अंतरीम जामीन देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com