Pramod Jathar exposes Sandesh Parkar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने संदेश पारकरांसाठी अडीच कोटी रुपये खर्च केला : प्रमोद जठार

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

..

वैभववाडी :   " पक्षनिष्ठा समजण्याएवढी त्यांची कुवत नाही. संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांना पक्षनिष्ठा समजण्याएवढी कुवत नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाने संदेश पारकरांसाठी अडीच कोटी रुपये खर्च केला तरी देखील ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यांना अजूनही राजकारण कळत नाही त्यांनी अजूनही मी सांगतो ते ऐकावे," असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी  श्री. पारकर यांना दिला.  

श्री. जठार म्हणाले, "केंद्रीय नेतृत्वाने कणकवली विधानसभा मतदारसंघातून नीतेश राणेंना उमेदवारी दिली आहे. पक्षाने दिलेला आदेश शिरसावंद्य मानून प्रत्येक पदाधिकाऱ्याने काम करणे आवश्‍यक होते.  परंतु स्वतःला पक्षाचे पदाधिकारी समजणारे अतुल रावराणे, संदेश पारकर, सभापती लक्ष्मण रावराणे, कणकवलीचे तालुकाध्यक्ष संदेश सांवत हे सूचना करूनही पक्षाच्या विरोधात काम करून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत."

ते पुढे म्हणाले," त्यामुळे या चौघांच्या हकालपट्टीचा एकमुखी ठराव जिल्हा कार्यकारिणीत झाला आहे. हा ठराव प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला आहे. येत्या 15 ऑक्‍टोबरला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड हे दोघे येणार असून त्यावेळी त्या चौघांवर कारवाईचा निर्णय होणार आहे.''
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख