प्रकाश शेंडगेंनी मुंडेसाहेबांना सर्वाधिक त्रास दिला : देवेंद्र फडणवीस

भाजपमधील ओबीसी नेत्यांना भेटून त्यांची खदखद बाहेर काढण्यासाठी प्रकाश शेंडगेंनी प्रयत्न चालविले आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी टोले लगावले आहेत.
pankaja munde-fadanvis
pankaja munde-fadanvis

सातारा : प्रकाशअण्णा शेंडगे हे गोपीनाथ मुंडेसाहेबांना किती टोकाचे बोलले, हे भाजपच्या  लोकांना माहीत नाही. मुंडे साहेबांना त्यांनी सर्वाधिक त्रास दिला आहे. तेच शेंडगे आता भाजपच्या नेत्यांना भेटत आहेत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेंडगे यांना लक्ष्य केले.

एका चॅनेलशी संवाद साधताना फडणवीस यांनी शेंडगे यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. `ओबीसी नेते नाराज आहेत. तुमच्या विरोधात ही खदखद आहे, ते पक्षाला काही सांगू पाहत आहेत, याबाबत तुमची भूमिका काय असेल,  या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले,  ``ओबीसी नेत्यांची खदखद ही मीडियाने तयार केलेल्या बातम्या आहेत. पहिल्यांदा पंकजाताईच्या नावाने त्या बातम्या चालवल्या.  त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले मी त्यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. काही मुद्दे असतीलही. पण सर्वकाही ठिक आहे. नंतर खडसे साहेबांचे नाव आले. ते काहीतरी बोलले असतील. पण मला आश्चर्य वाटते ओबीसी नेते म्हणून त्यांना भेटायला कोण गेले? तर प्रकाश शेंडगे. ते कोणत्या पक्ष्यात आहेत? काँग्रेसमध्ये की राष्ट्रवादीत मला, माहीत नाही. हेच शेंडगे गोपीनाथ मुंडे साहेबांना इतके टोकाचं बोलले हे भाजपच्या  लोकांना माहीत नाही. मुंडेसाहेबाना त्यांनी त्रास दिला. स्वतः मुंडे साहेब यांनी मला सांगितले होते. या माणसाकरिता मी काय काय केलं, अशी त्यांची खंत होती.

ओबीसी नेत्यांविषयी बोलताना ते म्हणाले, ``जात म्हणून आमदारांकडे पाहणे चुकीचे आहे, पण मी सांगतो भाजपचे 105 आमदार आहेत.  यातील 35 मराठा, 37 ओबीसी समाजाचे, 18 अनुसूचित जाती जमातीचे आणि सात खुल्या वर्गातील आहेत. पहिल्यापासून भाजपने ओबीसी समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व देण्याचे काम केले आहे. ओबीसी समाजाला खरोखर आपला पक्ष कोणता वाटत असेल तर भाजपच वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा ओबीसी आहेत. पण ते कधी सांगत नाहीत. त्यांना जातीवर बोललेले आवडत नाही.

भाजपचे बारा आमदार फुटतील, अशी बातमी काढण्यात आली. मला हे समजत नाही हे जे तीन पक्ष एकत्र आलेत त्यांना मंत्री ठरविता येते नाहीत, किती दिवस हे सरकार चालेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्या सरकारमध्ये कोणी जाणार नाही आणि आमचे तर कोणीही जाणार नाही, असा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार किती दिवस चालेल, यावर फडणवीस म्हणाले, हे अंतर्विरोधानी भरलेले सरकार आहे. देशात असे सरकार कुठेच चालले नाही. आता या तिघांमधील राष्ट्रवादी कुठेही फिट होते. पण शिवसेना आणि काँग्रेस यांच्याक किती मतभेद आहेत? काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणे या सारखे दुसरे दुर्दैव नाही, असा आरोप त्यांनी केला.

भविष्यात शिवसेना ही भाजपकडे येईल असे वाटते का, या प्रश्नावर ते म्हणाले, भविष्यात काय होईल हे सांगण्यापेक्षा शिवसेना भाजप हे नैसर्गिक युती होती. शिवसेना आमच्यापासून दूर गेली. ते त्यांनी ठरवायचे आहे. या महाविकास आघाडीत सर्वाधिक अपमानित शिवसेनेला व्हावे लागणार आहे. जो मान भाजपसोबत असताना होता तो आता राहिलाय काय़ आमच्यासोबत असताना `मातोश्री`वरून आदेश निघत होता. आज कुठे आहे हा आदर?``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com