praksh awade to exit congress | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

प्रकाश आवाडे कॉंंग्रेस सोडणार; जिल्हाध्यक्षच गटबाजीला वैतागला 

निवास चौगले
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

कोल्हापूर : अलिकडेच कॉंंग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आज कॉंंग्रेसला रामराम करणार आहेत. कॉंग्रेसकडून लढू नका, असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे श्री. आवाडे यांनी सांगितले. 

कोल्हापूर : अलिकडेच कॉंंग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आज कॉंंग्रेसला रामराम करणार आहेत. कॉंग्रेसकडून लढू नका, असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे श्री. आवाडे यांनी सांगितले. 

आज सकाळी आकराच्या सुमारास श्री. आवाडे यांच्या यंत्रणेकडून माध्यम प्रतिनिधींना फोन आले. त्यानंतरच त्यांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या निर्णयाची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. सहा महिन्यापुर्वीच श्री. आवाडे यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या आठवड्यात पक्षाच्या नव्या कार्यालयाचा उद्‌घाटन समारंभ अखिल भारतीय कॉंग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमातही श्री. आवाडे यांनी अतिशय पोटतिडकिने पक्षांतर्गत गटबाजीवर भाष्य केले. त्यामुळे ते कधीच कॉंग्रेस सोडतील असे वाटत नसतानाच आज त्यांच्याकडून पक्षाला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्‍यता आहे. 

आज श्री. आवाडे फक्‍त घोषणा करणार असले तरी गेल्यावर्षी 22 ऑगष्टलाच त्यांनी मी कॉंग्रेसचे काम कधीच थांबवल्याचे सूतोवाच केले होते. यामागे जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याशी त्यांचा सुरू असलेला वाद हे कारण होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यानंतर त्यांच्यासह माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांनी पक्षाच्या कार्याला वाहून घेतले. कल्लाप्पा आवाडे यांच्या पुढाकारामुळेच पक्षाचे भव्य असे सभागृह तयार झाले. पण तेही कॉंग्रेस सोडण्याची घोषणा सायंकाळी करणार आहेत. राज्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्‍यता असतानाच अचानक कॉंग्रेसमध्येच श्री. आवाडे यांच्या निर्णयाने भूकंप झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख