prakash solanke in ncp office jayant patil discuss with him | Sarkarnama

नाराज प्रकाश सोळंके राष्ट्रवादी कार्यालयात, समजूत काढण्याचा प्रयत्न 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांची समजूत काढण्यासाठी पक्षाचे बडे नेते पुढे सरसावले आहेत. 

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील काही आमदार नाराज झाले आहेत. मंत्री न केल्याने सोळंके यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली होती.

मात्र कालपासून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोळंके राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले असून ज्येष्ठ नेते आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. 

मंत्री मुंडे यांनी सोळंके यांचे आर्शिवादही घेतले आहे. मुंडे यांना मंत्री केल्याने सोळंके यांनी टीका केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स