कामाच्या बळावर जनता माझ्या पाठीशी : प्रकाश सोळंके

सामान्यांचा विकास हेच केंद्रबिंदू समजून सोळंके कुटुंब काम करत असल्याचेही प्रकाश सोळंके म्हणाले.
कामाच्या बळावर जनता माझ्या पाठीशी : प्रकाश सोळंके

माजलगांव : माजलगांव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस आणि त्यांचा विकास हा केंद्रबिंदु मानुन सोळंके कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासुन कार्यरत आहे. यामुळे जनतेशी नाळ घट्ट होत गेली. केलेल्या कामाच्या बळावर मतदार संघातील जनता माझ्या पाठीशी राहील असा विश्वास राष्ट्वादी काॅंग्रेसचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केला. 


माजलगांव विधानसभा मतदार संघात प्रचार अंतिम टप्यात आला असुन राष्ट्वादी काॅंग्रेसचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यासह धैर्यशिल सोळंके, जयसिंह सोळंके, मंगला सोळंके, उज्वला सोळंके, विरेंद्र सोळंके, पल्लवी सोळंके असे सोळंके कुटुंबीय प्रचारामध्ये उतरले आहे. मतदारांना प्रकाश सोळंके यांनी केलेल्या विकास कामांच्या पाठीशी रहावे असे आवाहन करत आहेत. 


शहरातील सर्वच प्रभागामध्ये काॅर्नर बैठकीचे आयोजन केले असुन यामध्ये बोलतांना प्रकाश सोळंके म्हणाले, विकासाचा आराखडा घेउन मतदारांपुढे आलो आहोत. देशभरात मंदीचे सावट निर्माण झाले असल्याने जनतेसमोर अनेक गंभिर प्रश्न उभे राहिले आहेत. मतदारसंघातील शेतीसह सर्व उद्योग क्षेत्रात वाईट परिस्थिती आहे.

 मंदावलेली अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी सर्वांगिण विकासाचा आराखडा जनतेसमोर घेउन मांडत आहे. मागील पाच वर्षांत विकासाला खिळ बसली असुन हे चित्र बदलण्यासाठी विकास कामांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन श्री. सोळंके यांनी केले आहे.  


निवडणूक महाराष्ट्राची  असून भाजपाकडून काश्मीरच्या कलम 370 चाप्रचार केला जातोय. राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, बंद पडणारे उद्योगधंदे याबाबत एक शब्दी उच्चारला जात नाही. जनतेचाी दिशाभूल करून भावनिक मुद्यांना हात घालणा-या भाजपाचे कारस्थान ओळखा असेही सोळंके म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com