राजकारणाची किळस आली, राजीनामा देऊन शांत जीवन जगणार : प्रकाश सोळंके

कोण्या व्यक्ती किंवा पक्षाबद्दल नाराजी नसल्याचेही प्रकाश सोळंके म्हणाले. पुढील काळात शांततेत जगण्यासाठी निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.
राजकारणाची किळस आली, राजीनामा देऊन शांत जीवन जगणार : प्रकाश सोळंके

बीड : राजकारणाची किळस आली, त्यामुळे आता बाजूला व्हायचे ठरविले आहे. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगाव मतदार संघातील आमदार प्रकाश सोळंके म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तानंतर आमदार सोळंके नाराज असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर फिरत असल्याने सरकारनामाने त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपण चुकीचे होतो म्हणून यात पडल्याचेही श्री. सोळंके यांनी सांगितले. 

दरम्यान, प्रकाश सोळंके चौथ्या वेळी आमदार आहेत. पंचायत समितीचे सभापती ते राज्यमंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल आहे. दिवंगत लोकनेते सुंदरराव सोळंके यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या प्रकाश सोळंके यांनी सगल तीन वेळा विजयी होण्याचा माजलगाव मतदार संघात विक्रम केलेला आहे. दिवंगत सोळंके राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते. या मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा कोणीही विजयी झालेले नसताना श्री. सोळंके मात्र सलग तीन वेळा विजयी झाले. 

मागच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी महसूल, भूकंप व पुनर्वसन, पणन, सहकार अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. यावेळीही त्यांनी विजय मिळविला. जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे विजयी झालेल्यांमध्ये चौथ्यांदा विजयी झालेले केवळ प्रकाश सोळंके आहेत. धनंजय मुंडे, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर हे प्रथमच विधानसभेत आहेत. प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना खात्री होती. मात्र, धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यानंतर सोळंके नाराज झाले. त्यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com