पुरग्रस्तांसाठी प्रकाश सोळंकेंकडून एक महिन्याचे निवृत्तीवेतन, मदतफेरीही काढली

 पुरग्रस्तांसाठी प्रकाश सोळंकेंकडून एक महिन्याचे निवृत्तीवेतन, मदतफेरीही काढली

माजलगाव (जि. बीड) : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा सरसावला आहे. मदतीसाठी शनिवारी माजलगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मदतफेरी काढली. यात 82 हजार रुपयांची रक्कम जमा झाली. यात श्री. सोळंके यांनी आपले एक महिन्याचे निवृत्तीवेतनाचे 70 हजार रुपये जमा केले. 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना जिल्ह्यातून कपडे, शुद्ध पाणी, खान्याचे पदार्थ आणि रोख रक्कम अशी विविध माध्यमांतून मदत जमा होत आहे. विविध मालमोटारीतून ही मदत रोजच्या रोज रवाना होत आहे. दरम्यान, शनिवारी राष्ट्रवादीने माजी मंत्री श्री. सोळंके यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या फेरीत रोख 82 हजार रुपयांसह कपडे, जेवणाचे साहित्य, बिस्कीटे, पाण्याच्या बॉटल आदी साहित्य जमा केले. फेरीत सभापती अशोक डक, जयसिंग सोळंके, रमेश सोळंके, डॉ. उद्धव नाईकनवरे, जयदत्त नरवडे, निळकंठ भोसले सहभागी झाले होते. यानंतर प्रकाश सोळंके यांनीही आपले निवृत्तीवेतनाची एक महिन्याची 70 हजार रुपयांची रक्कम जमा केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com