prakash reddy writes to cm about asha workers in maharashtra | Sarkarnama

`कोरोनाशी लढणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे'

संपत मोरे
बुधवार, 25 मार्च 2020

"कोरोनाचा सामना करण्यासाठी ७२ हजार आशा कर्मचारी आणि ४ हजार गट प्रवर्तक खेडोपाडी जाऊन माहिती घेत आहेत. गाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातील दुवा बनल्या आहेत. मात्र त्यांना मास्कसारख्या सुविधाही नाहीत. त्याना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा नाही" असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी म्हटलं आहे.

पुणे- "कोरोनाचा सामना करण्यासाठी ७२ हजार आशा कर्मचारी आणि ४ हजार गट प्रवर्तक खेडोपाडी जाऊन माहिती घेत आहेत. गाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातील दुवा बनल्या आहेत. मात्र त्यांना मास्कसारख्या सुविधाही नाहीत. त्याना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा नाही" असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी म्हटलं आहे.

"आशा सेविकांच्या प्रश्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे" अशीही मागणी त्यांनी केली आहे.

कॉ.रेड्डी यांनी एक पत्रक काढून ही मागणी केली आहे. हे पत्रक मुख्यमंत्री ठाकरे यांना उद्देशून लिहिले आहे. " आपण महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्यासाठी चांगले कार्य करत आहात. आमचे सर्व सहकार्य आपल्याला आहे.कोरोनाचा सामना करण्यासाठी महराष्टात ७२ हजार आशा कर्मचारी (ASHA मान्यताप्राप्त आरोग्य कर्मचारी) व ४ हजार गट प्रवर्तक खेडोपाडी जाऊन माहिती गोळा करत आहेत. सरकारला देत आहेत.  गाव व प्राथमिक आरोग्य केंद्र मधील हा दुवा आहे. त्यांना साध्या  मास्कसारख्या प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यांना सरकारी  कर्मचारी म्हणूनही दर्जा नाही. पगारही तुटपुंजा आहे. कोरोना विरोधी लढाईत त्यांचे बळ वाढवण्याठी त्यांच्या प्रश्नात आपण लक्ष घालावे व त्यांना मानसिक बळ द्यावे."असे रेड्डी यांनी या पत्रकात म्हटले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख