prakash raj attack modi | Sarkarnama

  " मैने मांगा राशन, उन्होने दिया भाषण', प्रकाश राज यांची मोदींवर टीका 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

बंगलोर : पाच राज्यात भाजपचा पाडाव होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांना आनंदराच्या उखळ्या फुटल्या आहेत. अनेक कट्टर विरोधापैकी एक असलेले दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी मोदींना लक्ष करताना म्हटले आहे की " मैंने मांगा राशन, उसने दिया भाषण' 

मोदींच्या भाषणांवर टीका करताना प्रकाश राज यांनी मोदींची भाषणे, त्यांचे परदेशी दौरे या मुद्द्यांवर उपहासात्मक मीम्स शेअर करत निशाणा साधला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जनतेने भाजपला जशास तसे उत्तर दिले आहे, निवडणुकांमधून जनतेनं त्यांची मन की बात सांगितली आहे. प्रकाश राज यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदींना चिमटे काढले आहेत. 

मोदी खोटं बोलतात, प्रसारमाध्यमं खोट्या बातम्या पसरवते, भाजपाचे प्रवक्ते खोट्या गोष्टींवर स्पष्टीकरण देत बसतात तर भाजपचे कार्यकर्ते मात्र या गोष्टी गोष्टींवर विश्वास ठेवतात असेही प्रकाश राज यांचे म्हणणे आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख