तिकिटाच्या लढाईत शिष्याने केली गुरुवर मात !

पराग शहा यांनीपहिल्यांदाच त्यांचा वॉर्ड सोडून बाहेर पोस्टर बाजी सुरु केली. गणपती पासून त्यांची ही पोस्टर बाजी सुरु झाली होती. त्यामुळे शहाच महेता डोईजड होणार हे संकेत मिळू लागले होते.
Parag-Shah-prakash-mehata
Parag-Shah-prakash-mehata

मुंबई : भाषिक राजकरणात कट्टर प्रतिस्पर्ध्याचा पराभव करण्यासाठी आमदार प्रकाश महेता यांनी पराग शहा यांना महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यांची ही खेळी यशस्वी झाली.मात्र,अवघ्या दोन अडीच  वर्षातच ही खेळी त्यांच्यावर उलटली.

प्रकाश महेता यांना तिकीट डावलून भाजपने पराग शहा यांना उमेदवारी दिली. शिष्याने गुरुला मात दिली अशी चर्चा आता सुरु झाली. त्यातच हा पर्याय नव्हता तर पराग शहा यांनी या वर्षीच्या सुरवाती पासूनच स्वत:च्या वॉर्डाच्या सिमा ओलांडून बाहेर येण्यास सुरवात केली होती.

"त्याला राजकरणात मीच आणले. तो बिझनेसमन होता . सामाजिक संस्थांमध्ये काम करायचा'',अशी खदखदही प्रकाश मेहता यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

2012च्या निवडणुकीत नगरसेवक निवडणुकीची उमेदवारी नाकारली म्हणून भाजपचे नगरसेवक प्रविण छेडा यांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यांनी थेट प्रकाश महेता यांनाच आव्हान दिले होते. हे आव्हानही त्यांनी पेलले होते . त्या निवडणुकीत महेता यांचे विश्‍वास भालचंद्र शिरसाट यांचा पराभव केला होता . 

2017च्या निवडणुकीत पुन्हा प्रविण छेडा विजयी होऊ नये म्हणून प्रकाश मेहता यांनी बांधकाम व्यावसायिक पराग शहा यांना त्यांच्या विरोधात मैदानात उतरवले. गरोडीया नगर,राजावाडी रुग्णालय परीसरात गुजराती मतदार निर्णायक असल्याने छेडा यांच्या विरोधात शहा यांना महेता यांनी मैदानात उतरवले.त्यांचा हा डाव तेंव्हा यशस्वी झाला.

घाटकोपरच्या राजकरणावर प्रकाश महेता यांची मजबुत पकड होती. गेल्या दोन दशकात त्यांनी या भागातील शिवसेना संपवली.पण,त्यांचे मातोश्रीवर चांगले संबंध असल्याने शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यांना उघड विरोध करु शकत नव्हते. 


अशातच त्यांचे नाव ताडदेव येथील एसआरए घोटाळ्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते सुरवाती पासूनच ना आवडते होते.या घोटाळ्याची संधी साधून मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.


त्यानंतर अल्पावधीत त्यांची उमेदवारी कापली जाणार अशी चर्चा सुरु झाली. पराग शहा यांनीही संधी साधण्यास सुरवात केली. मुंबईतील सर्वात श्रीमंत राजकरणी म्हणून संपुर्ण शहराला त्यांची माहिती होती मात्र त्यांनी पहिल्यांदाच त्यांचा वॉर्ड सोडून बाहेर पोस्टर बाजी सुरु केली. गणपती पासून त्यांची ही पोस्टर बाजी सुरु झाली होती. त्यामुळे शहाच महेता डोईजड होणार हे संकेत मिळू लागले होते. 

इच्छूक म्हणून त्यांनी पक्षाकडे मुलाखतीही दिल्या होत्या. अखेरीस त्यांना उमेदवारी मिळाली. पण,ही उमेदवारी आयत्या वेळी नसून ती ठरवून केलेली रणनीती होती. महेता यांना दोन दिवसांपुर्वीच याची कुणकुण लागली होती. मात्र,राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून कोणतीही सुचना येत नसल्याने झाकली मुठ सव्वा  लाखाची अशी परीस्थीती महेता यांची झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com