Prakash Mehata - Parag Shah come togather | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

चवथ्या फेरीत आदित्य ठाकरे 19954 मतांनी आघाडीवर....
दौंड (पुणे) मध्ये आमदार राहुल कुल ६३३९ मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरीअखेर धनंजय मुंडे 13 हजार मतांनी आघाडीवर
साताऱ्यातून उदयनराजे 32 हजार मतांनी पिछाडीवर
रोहित पवार आठव्या फेरीअखेर 12170 मतांनी आघाडीवर
येवला मतदारसंघ- छगन भुजबळ ३४७२ मतांनी आघाडी
मालेगाव बाह्य - शिवसेनेचे दादा भुसे 21 हजार 913 मतांनी आघाडीवर.
कुलाबा मतदार संघात भाजप चे राहुल नार्वेकर 7 हजार मतांनी आघाडीवर
चिंचवड - भाजपचे लक्ष्मण जगताप 7785 मताने आघाडीवर.
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

घाटकोपरमध्ये प्रकाश मेहता - पराग शहा यांच्यात अखेर  दिलजमाई 

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

तिकीट नाकारल्याने संतप्त झालेल्या मेहता समर्थकांनी मेहता यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची मागणी केली होती. मात्र मेहता यांनी कार्यकर्त्यांना समजावले.

मुंबई: माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारून भाजपचे पराग शहा यांना घाटकोपर पूर्व या मतदार संघातून उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्या मेहता समर्थकांनी शहा यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीची तोडफोड केली. विधानसभेच्या तिकीटावरून निर्माण झालेला या मतदार संघातील वाद आता मावळला असून पाच दिवसानंतर मेहता-शहा यांचे मनोमिलन झाले आहे.

बोरिवलीतून माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, घाटकोपर पूर्व मधून प्रकाश मेहता यांची तिकीटे कापली. मात्र मेहता समर्थकांनी गेल्या शनिवारी (ता. 5) शहा यांची गाडी फोडली. पराग शहा हे उद्योगपती आहेत. ते राज्यातील उमेदवारांमध्ये श्रीमंत उमेदवार आहेत. तिकीट नाकारल्याने संतप्त झालेल्या मेहता समर्थकांनी मेहता यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची मागणी केली होती. मात्र मेहता यांनी कार्यकर्त्यांना समजावले.

जमीन घोटाळ्याचा फटका मेहता यांना या निवडणुकीत बसला. मात्र शहा यांना आयती संधी चालून आली आणि ते नगरसेवक असताना त्यांना थेट विधानसभेचे तिकीट मिळाले. गेल्या पाच दिवसांपासून या मतदार संघात भाजपांतर्गत खदखद होती. काल दोन्ही उमेदवारांचे मनोमिलन झाल्याचे दिसून आले.

Image result for sanjay raut facebook

घाटकोपर पूर्वेस असलेल्या भानूशालीवाडीमध्ये शहा यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय्य राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी महेता उपस्थित होते. मेहता यांनी यावेळी शहा यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून आणण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, शहा हे शंभर टक्‍के निवडून येतील. या मतदार संघात भाजपचे काहीही नसताना मी हा मतदार संघ बांधला. मतदार संघासाठी मी खूप काही केले आहे, असे बोलता बोलता ते भावूक झाले.

शहा यांना शुभेच्छा देताना खासदार राऊत हे शहा यांना म्हणाले की, प्रकाश मेहता हे तुमचे गुरू आहेत. त्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वानेच तुम्ही निवडून याल. आठवले यांनीही शहा यांना शुभेच्छा दिल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख