आजचा वाढदिवस - प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री - prakash jawadekar mp | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस - प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जानेवारी 2018

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकाश जावडेकर यांची राजकीय कारकिर्द सध्या नव्या वळणावर आहे. पर्यावरण मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर गेल्यावर्षी त्यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून जबाबदारी आली. शालेय शिक्षणपासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक नव्या बदलांची सुरवात त्यांनी केली आहे. पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात असताना विद्यार्थी परिषदचे काम मोठ्या जोमाने केल्यानंतर पक्षीय राजकारणात प्रवेश केला. या दरम्यान काही काळ बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकाश जावडेकर यांची राजकीय कारकिर्द सध्या नव्या वळणावर आहे. पर्यावरण मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर गेल्यावर्षी त्यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून जबाबदारी आली. शालेय शिक्षणपासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक नव्या बदलांची सुरवात त्यांनी केली आहे. पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात असताना विद्यार्थी परिषदचे काम मोठ्या जोमाने केल्यानंतर पक्षीय राजकारणात प्रवेश केला. या दरम्यान काही काळ बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली. आणिबाणीच्या काळात केलेल्या आंदोलनात अटक होऊन येरवडा कारागृहात राजकीय बंदी म्हणून त्यांना राहावे लागले. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1995 साली युती सरकारच्या काळात राज्य नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदाची धुरा जावडेकर यांनी सांभाळली.  केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता होती. त्या काळात पक्षाचे प्रवक्ते म्हणून केंद्रीय नेतृत्वाने त्यांना दिल्लीत बोलावून घेत पक्ष प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी जावडेकर यांनी सक्षमपणे पार पाडली. पक्षाच्यावतीने राज्यसभेवर त्यांना संधी देण्यात आली. दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आले. पहिल्या टप्प्यात जावडेकर यांच्याकडे पर्यावरणमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. गेल्यावर्षी मुनष्यबळ विकास मंत्रालयाचा कारभार देण्यात आला. जावडेकर यांच्या माध्यमातून पुण्याला आणि राज्याला केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख