prakash javdekar brought proposal of expelling gopinath munde | Sarkarnama

मुंडेंच्या हकालपट्टीचा निरोप घेऊन जावडेकर आले होते!

संपत मोरे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या भाजपचा आत्मा आहेत. त्यांच्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही, असे आम्ही सांगितले होते- प्रकाश शेंडगे

पुणे : "गोपीनाथ मुंडे यांची हकालपट्टी करण्याचा निरोप घेऊन प्रकाश जावडेकर आले होते, मात्र आम्ही जोरदार विरोध केला. हा निरोप त्यांनी दिल्लीवरून आणला होता," असा दावा गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

कालपासून माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाजपवर टीका सुरू केली आहे. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या हकालपट्टीचा ठराव आला होता, या घटनेची आठवण करून देत त्यांनी पंकजा मुंडे यांना सावध रहाण्याचा सल्ला दिला होता.

आज त्यांनी मुंडे यांच्या हकालपट्टी प्रकरणाविषयी नवीन माहिती दिली. 'दिल्लीचा निरोप घेऊन प्रकाश जावडेकर आले होते, मात्र आम्ही त्याला विरोध केला. मी, एकनाथ खडसे, सांगलीचे संभाजी पवार यासह अनेक आमदारांनी विरोध केला होता" असे शेंडगे म्हणाले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख