प्रकाश आंबेडकरांचे पदाधिकाऱ्यांना पत्र; 'एनआरसी', 'सीएए'ला करा विरोध

अॅड. आंबेडकर यांनी नुकताच मुंबईत एनआरसी व सीएएला विरोध करीत मोर्चा काढला. आता राज्यभर आंदोलनाची दिशा ठरली असून 6 जानवोरीला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदांसमोर आंदोलन होणार असून आंदोलनाला गर्दी जमवून ते यशस्वी करण्याची जबाबदारी वंचितच्या जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्‍त्यांवर सोपविण्यात आल्याची चर्चा आहे
Prakash Ambedkar Writes Letter to Party Officie Bearers for Agitation Against NRC
Prakash Ambedkar Writes Letter to Party Officie Bearers for Agitation Against NRC

सोलापूर : देशात वर्षानुवर्षे राहणाऱ्या हिंदूंना 1951 पूर्वीचे पुरावे नागरिकत्त्वासाठी द्यावे लागणार आहेत. मात्र, देशातील बहुतांश जमातींकडे पुरावेच नाहीत. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेला एनआरसी व सीएएच्या नावाखाली चालवलेला देश विभाजनाचा डाव आखला आहे. तो हाणून पार पाडण्याच्या हेतूने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकरांनी पदाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. 

त्यानुसार शनिवारी (ता. 4) प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात बैठक पार पडली. मोदी सरकारने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (एनआरसी) व सीएए (सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्‍ट) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाव नोंदविण्यासाठी जन्म प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र, देशात अनेकजण अशिक्षित असून अनेकांकडे जन्माचे पुरावेही नाहीत. त्यामुळे बऱ्याच नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यास अडचणी येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर विविध संघटना, राजकीय पक्षांनी विरोधात भूमिका घेतली असून जानेवारीत देशभर आंदोलनाचा भडका उडण्याचे चित्र दिसू लागले आहे. 

अॅड. आंबेडकर यांनी नुकताच मुंबईत एनआरसी व सीएएला विरोध करीत मोर्चा काढला. आता राज्यभर आंदोलनाची दिशा ठरली असून 6 जानवोरीला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदांसमोर आंदोलन होणार असून आंदोलनाला गर्दी जमवून ते यशस्वी करण्याची जबाबदारी वंचितच्या जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्‍त्यांवर सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार बैठकांचा जोर सुरु झाला असून कॉर्नर सभांचेही नियोजन करण्यात आले आहे. 

या बैठकीला नगरसेविका ज्योती बमगोंडे, नगरसेवक गणेश पुजारी, वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, बबन शिंदे, शहराध्यक्षा रेश्‍मा मुल्ला, अंजना गायकवाड, धम्मरक्षिता कांबळे, सुजाता वाघमारे, पल्लवी सुरवसे, हेमा वाघमारे, मंदाकिनी शिंगे, आशालता शिवशरण, फुलावती काटे, मिनाक्षी बनसोडे, पुष्पा गायकवाड, मुक्‍ता बनसोडे, पुष्पा आव्हाड आदी उपस्थित होते.

अॅड. प्रकाश आंबेडकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com