prakash ambedkar will not alliance to bjp devendra fadanvice | Sarkarnama

प्रकाश आंबेडकर भाजपशी कधीच युती करणार नाहीत, देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

नागपूर : प्रकाश आंबेडकरांनी भाजपशी कधीच युती केली नाही. ते करणारही नाही. आणि "एमआयएम'शी युती करण्याचा संबंधच येत नाही असे स्पष्ट करतानाच शिवसेनेचे प्रेम छुपे आहे तर आमचे उघड आहे. कुणी कितीही नाकारले तरी भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून युतीचे संकेतही दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शिवसेना सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्य सरकारच्या कारभारावर सत्तेत राहूनही टीका करीत आहे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सामना तसेच जाहीर सभांमधून भाजपला ठोकून काढत आहेत, त्यामुळे युती होणार की नाही याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहेत.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. तशी घोषणाही दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता त्यांनी युती होणारच असे सांगितले. 

शिवसेनेकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आली नाही. भाजपच शत्रू असल्याचे ते सांगत आहेत. भाजपने दिलेले आश्‍वासन खोटे असल्याचीही टीका जाहीरपणे केली जात आहे. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका आम्ही समकारात्मक घेत असल्याचे सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दसरा मेळाव्यातील सेना प्रमुखांचे भाषण युती होण्याचे संकेत देणारे आहे. युतीबाबतचे आमचे प्रेम उघड आहे. त्यांचे प्रेम लपून आहे. दोन्ही समविचारी पक्ष असल्याने युती होणार आहे. सेनेकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

एमआयएमशी संबंधच नाही 
आंबेकडर आणि एमआयएमच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी न झाल्यास त्याचा भाजपला फायदा होण्याचा आरोप करण्यात येतो. प्रकाश आंबेडकरांनी भाजपशी कधीच युती केली नाही. ते करणारही नाही. आणि एमआयएमशी युती करण्याचा संबंधच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख