मुंबईची माहिती नसलेल्यांचाच 'नाईट लाईफ'ला विरोध : प्रकाश आंबेडकर

आदित्य ठाकरे यांनी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नाईट लाईफ सुरु ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन दिले आहे
Prakash Ambedkar Supports Night Life Project
Prakash Ambedkar Supports Night Life Project

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नाईट लाईफ सुरु ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन दिले आहे. मी नाईट लाईफच्या जगातच मोठा झालो आहे. ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांच्या विरोधात प्रकाश आंबेडर यांनी येत्या 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना 24 जानेवारीचा महाराष्ट्र बंद शांततेने करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली.

याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याऐवजी तो पैसा वाडीया रुग्णालयाला देण्याच्या माझ्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. मात्र, याचा निर्णय राज्य सरकार आणि कोर्टाने घ्यावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com