नाइट लाइफला प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा   

राज्यातील केवळ मुंबईच नव्हे सर्वच महानगरांमध्ये 'नाइट लाइफ' ची आवश्यकता असल्याचे मत वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (ता.१८) पुण्यात बोलताना व्यक्त केले
Prakash Ambedkar Supports Night Life Concept
Prakash Ambedkar Supports Night Life Concept

पुणे  :  राज्यातील केवळ मुंबईच नव्हे सर्वच महानगरांमध्ये 'नाइट लाइफ' ची आवश्यकता असल्याचे मत वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (ता.१८) पुण्यात बोलताना व्यक्त केले. मी स्वत: हे सर्व आयुष्य जगलोय, उपभोगले आणि अनुभवले असल्याने, मी या नाइट लाइफच्या बाजूने असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काय निर्णय घेतला हे माहित नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे समजू नका. केवळ मी नाइट लाइफच्या बाजूने आहे, असे म्हणत त्यांचा  ठाकरे यांच्या नाइट लाइफच्या  निर्णयाला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे ही यावेळी स्पष्ट झाले. ते म्हणाले, "राज्यातील महानगरांमध्ये रोजगार आणि नोकरीच्या निमित्ताने अनेक नागरिक येत असतात. त्यापैकी अनेकांना रात्रपाळीत काम करावे लागते. त्यांच्यासाठी नाईट लाईफ आवश्यक आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com