...आणि तेलतुंबडे प्रकरणाबाबत प्रकाश आंबेडकरांना घ्यावी लागली ही भूमिका!

शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्यात सुरू असलेल्या राजकारणात तेलतुंबडे प्रकरणात कार्यकर्ते व नेते भावनिक होऊन त्यांचे विचार माध्यमांवर व सोशल मीडियावर मांडत सुटले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत भूमिकेबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेली भूमिकाच अधिकृत असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले.
Prakash Ambedkar Stand will be Final in Teltumbde Issue
Prakash Ambedkar Stand will be Final in Teltumbde Issue

अकोला : राज्यातील राजकारण आनंद तेलतुंबडे प्रकरणानंतर ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणात थेट भूमिका मांडताना जाहीर वक्तव्य करण्यास सुरुवात केली. राज्यात कोरोना विषाणूचे संकट असताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जहाल भूमिकांमुळे प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या भूमिकेशिवाय  कुणीही कोणतीही भूमिका मांडू नये, अशी सूचना राज्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.

आनंद तेलतुंबडे हे दलित चळवळीतील आघाडीचे विचारवंत आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. 31 डिसेंबर 2017ला झालेल्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात काही विचारवंतांना, लेखकांना 28 ऑगस्ट 2018 ला अटक करण्यात आली होती. हे अटकसत्र सुरू असताना आनंद तेलतुंबडे यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता. आनंद तेलतुंबडेंच्या मते पोलिसांनी कोणतंही वॉरंट नसताना त्यांच्या अनुपस्थितीत घराची झडती घेतली. घराचे चित्रीकरण केलं आणि घर पुन्हा बंद केलं.

तेलतुंबडेंच्या पत्नीने केली पोलिसांत तक्रार

तेव्हा तेलतुंबडे मुंबईत होते. हा सगळा प्रकार समजल्यावर त्यांची पत्नी गोव्याला गेली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आनंद तेलतुंबडे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी ता. 14 एप्रिल रोजी एनआयएच्या कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केलं. त्यावेळी प्रकाश आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे, आनंद आंबेडकर, आमदार कपिल पाटील उपस्थित होते. यानंतर कोर्टाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे. 

प्रकाश आंबेडकर मांडतील तिच अधिकृत भूमीका

या सर्व प्रकरणानंतर राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वेगवगेळ्या माध्यमातून, सोशल मीडियातून त्यांची भूमिका जाहीरपणे मांडण्यास सुरुवात केली. अशा प्रकारच्या जाहीर भूमिकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीची अधिकृत भूमिका ही बाळासाहेबच मांडतील. त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही काही भूमिका मांडली तर ती पक्षाची अधिकृत भूमिका नसेल किंवा जाहीरपणे वक्तव्य करूच नये अशी सूचना बाळासाहेबांनी पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांच्या माध्यमातून राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली आहे.

कार्यकर्त्यांना दिली ही सूचना

''वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सूचित करण्यात येते की, पक्षाचे वतीने येणारे कुठलेही आदेश, प्रतिक्रिया अथवा भूमिका या पक्षाच्या वतीने लेटर पॅड वर काढण्यात येतात किंवा अड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या व्हिडिओ अथवा त्यांचे फेसबुक पेज आणि ब्लू टिक असलेल्या ट्विटर हँडल वरून प्रसारित केले जातात. अथवा बाळासाहेब आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतात. सबब या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे पक्षाचे वतीने अधिकृतपणे जाहीर होणाऱ्या भूमिकांशी विसंगत मांडणी कुणीही करू नये,'' अशी सूचना पक्षाचे प्रवक्त डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि राजेंद्र पातोडे यांच्या वतीने सर्वांना देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com