आंबेडकर  म्हणतात, लवकरच उद्धव ठाकरेंचा पाेपट हाेईल !

ईव्हीएमचा खेळ काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे. त्यांनी निडणुकीत अनेकांना पाडण्यासाठी त्याचा वापर केला. -प्रकाश आंबेडकर
Ambedkar-Thackeray.
Ambedkar-Thackeray.

अकोला :  राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारुंचे सरकार आहे. या संघटित टोळ्यांसोबत वंचित बहुजन आघाडीच्या लढा असल्याचे भाष्य   प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी अकोला येथे वंचितच्या मेळाव्यात केले.


केंद्र व राज्य सरकारवर वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांनी शरसंधान साधताना सध्या लुटारुंसारखी सत्ताधाऱ्यांची टाेळी असून, माेंदींसह अनेकांकडून असे खेळ सुरू असल्याची टिका केली. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालीची वाटणीच केली असून, लवकरच उद्धव ठाकरेंचा पाेपट हाेईल, असा टाेलाही त्यांनी लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही ईव्हीएम विरोधात आंदोलन केले. मात्र आता ते ईव्हीएमला विरोध करणार नाही. आता तेच सत्ताधारी असून, ही मशिन त्यांच्या ताब्यात आहेत, याची त्यांना जाणीव असल्याचे आंबेडकर म्हणाले.

ईव्हीएमचा खेळ काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे. त्यांनी निडणुकीत अनेकांना पाडण्यासाठी त्याचा वापर केला. भाजपच्या हे लक्षात आल्यानंतर सत्तेत येताच त्यांनी मशिनचा वापर स्वत: जिंकण्यासाठी केला. ईव्हीएम असेपर्यंत आपण लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याची अपेक्षा सोडून, द्या असेही त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले. 

हैदराबाद युवती जळीत प्रकरणात वेगळेच रहस्य दडले असल्याचा दावा करताना  आंबेडकर म्हणाले,  पीडीतेने ती काम करीत असलेल्या सरकारी विभागातील गैरप्रकारांची पोलखोल केल्यानेच तिला संपविण्यात आले. त्यामुळे विरोधात जाल, तर या देशात जिवंत राहू शकत नाही, असे प्रकार सुरू असल्याचा आराेप त्यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com