प्रकाश आंबेडकरांनी आमदार सिरस्कारांचे तिकीट कापले!

दोन वेळा भारिप-बमसंच्या तिकिटावर आमदार राहिलेले हरिदास भदे यांना चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले.
प्रकाश आंबेडकरांनी आमदार सिरस्कारांचे तिकीट कापले!

अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी मुंबईत सोमवारी जाहीर करण्यात आली. बाळापूरमध्ये युतीच्या मराठा कार्डविरोधात वंचित बहुजन आघाडीनेही मराठा कार्ड वापरत  विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना धक्का देत प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना उमेदवारी दिली. अकोला पूर्वमध्ये सलग चौथ्यांना माजी आमदार हरिदास भदे भाग्य आजमाविणार आहे. अकोला पश्‍चिममध्ये सिमेंट व्यावसायिक इम्रान पुंजानी यांचे नाव जाहीर करून सर्व चर्चांना पूर्ण विराम देण्यात आला.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आणि घट स्थापनेसोबतच जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेनेने युती जाहीर होण्यापूर्वीच उमेदवाराची घोषणा करताच वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील पाच पैकी तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. पक्षाच्या वतीने सोमवारी सायंकाळी मुंबईत ही दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात बाळापूर, अकोला पूर्व आणि अकोला पश्‍चिम या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. गत दोन निवडणुकांमध्ये बाळापूर मतदारसंघातून डावलण्यात आलेले प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना अखेर ‘वंचित’ने निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप-शिवसेना युतीतर्फे शिवसेनेचे नितीन देशमुख यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर आणि काँग्रेसचे नाव अद्याप जाहीर झाले नसतानाच ‘वंचित’ने डॉ. पुंडकर यांची उमेदवारी जाहीर करून बाळापूरमध्ये काँग्रेसचे सामाजिक समिकरण बिघडविले आहे. अकोला पश्‍चिममध्ये काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस हा निर्णय होण्यापूर्वीच मुस्लिम कार्ड वापरून येथेही काँग्रेस आघाडीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न ‘वंचित’ने केला आहे. अकोला पश्‍चिममधून डॉ. रहेमान खान यांच्या नावाची जिल्हाध्यक्षांनी शिफारस केल्यानंतरही इम्रान पुंजानी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे डॉ.रहेमान खान यांना यावेळीही उमेदवारीपासून ‘वंचित’ रहावे लागले. दुसरीकडे पूर्वमध्ये २०१४ चे चित्रच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. दोन वेळा भारिप-बमसंच्या तिकिटावर आमदार राहिलेले हरिदास भदे यांना चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com