prakash ambedkar mocks ramdas athavale | Sarkarnama

रामदास आठवलेंविषयी प्रश्न विचारताच आंबेडकर निघून गेले....

रूपेश पाटील
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पालघर : रामदास आठवले आणि तुम्ही एकत्र येणार का, या प्रश्नावर नो काॅमेंटस असे उत्तर देत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलणेच थांबविले. पालघर येथे बहुजन वंचित विकास आघाडीच्या सभेपूर्वी आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते वेगवेगळ्या विषयांवर बोलले. पण आठवले यांच्याविषयी प्रश्न विचारताच ते निघून गेले.

सध्या आठवले आणि आंबेडकर यांच्यात स्पर्धा सुरू आहेत. आंबेडकर यांच्या औरंगाबाद येथे झालेल्या सभेला मोठी गर्दी झाली होती. या गर्दीपेक्षा अधिक संख्या जमविण्याची भाषा आठवले यांनी केली होती. मात्र त्यात ते यशस्वी झाले नाहीत. मात्र आंबेडकरांची इच्छा असेल तर त्यांच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचे आठवले यांनी सांगितले होते..

रिपब्लिकन ऐक्याचा प्रश्न विचारला तरी आंबेडकर त्यावर बोलत नाहीत. थेट आठवलेंचा प्रश्न विचारल्यावर त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. त्या आधी झालेल्या प्रश्नोत्तरांत त्यांनी काॅंग्रेसला बदमाष म्हणून टीका केली.

काँग्रेसची आम्ही  बारा जागांवर अडवणूक करत नसून ज्या लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार वारंवार अपयशी ठरले आहेत, त्याठिकाणी आम्ही संधी देण्याची मागणी करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघा  ला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी आराखडा द्या अन्यथा आम्ही 48 जागा लढवू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला आहे . काँग्रेस कडून एमआयएम साठी अडवणूक केली जात असल्याच्या प्रश्नावर एमआयएम लोकसभा लढवणार नसून काँग्रेस लबाड असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख