प्रकाश आंबेडकरांना कदाचित "आरएसएस' ची फूस - इम्तियाज जलील

प्रकाश आंबेडकरांना कदाचित "आरएसएस' ची फूस - इम्तियाज जलील

औरंगाबाद : राज्यात वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीला एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष संपल्यात जमा आहेत. अशावेळी एमआयएमला आठ जागा देऊ असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर आम्हाला का झुलवत ठेवत आहेत ? हे कळायला मार्ग नाही. बहुदा एमआयएमला सोबत घेऊ नका अशी "आरएसएस'ची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांना फूस असावी अशी शंका खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

एमआयएम सोबतच्या आघाडीची बोलणी आम्ही पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांच्याशीच करू, इम्तियाज जलील यांना ते अधिकार नाहीत असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अजूनही आमची युती कायम असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 
इम्तियाज जलील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत एमआयमने आपल्या जागांची यादी द्यावी हे जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सांगितले तेव्हा आम्ही त्यांना 98 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी तो कमी करून पाठवण्यास सांगितले तेव्हा, तो 74 जागांवर आणला. पंरतु त्यानंतर त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. ओवेसी आंबेडकरांच्या बैठकीत देखील त्यात तोडगा निघाला नाही. 

विधानसभा निवडणुकांची तयारी करायला पुरेसा वेळ देता यावा, ओवेसींच्या सभांचे नियोजन करता यावे यासाठी ज्या जागा द्यायच्या आहेत, त्या आम्हाला सांगा अशी आमची मागणी होती. पण आम्ही इम्तियाज जलील यांच्याशी बोलणार नाही, ओवेसी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे असे सांगत वंचितच्या प्रवक्‍त्यांनी पत्रके काढत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ओवेसींनी वंचितकडे 17 जागांची यादी दिली होती, हा शोध कुणी लावला असा सवाल देखील इम्तियाज यांनी यावेळी केला. 

माझी हात जोडून विनंती, त्यांनी मार्ग काढावा.. 
राज्यात वंचित बहुजन आघाडी व एमआयएमला पूरक वातावरण आहे. अशावेळी जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो लवकर घ्यावा, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, त्यांनी तातडीने मार्ग काढावा अशी विनंती देखील इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केली. प्रकाश आंबेडकर यांचा माझ्यावर राग का आहे ? हे माहित नाही. पण मी जे पत्रक काढले ते ओवेसी यांच्या परवानगीनेच काढले होते. ती आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे असे स्पष्ट करतांनाच इम्तियाज म्हणाले, ओवेसी हे माझे गॉडफादर आहेत. त्यांनी सांगितले तर दोन मिनिटात मी प्रदेशाध्यक्ष पदाचा व खासदारकीचा राजीनामा देईन. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com