भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विसर्जित

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भक्कम जनाधार मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप-बहुजन महासंघाला विसर्जित करण्यात आले आहे. यासंबंधिचा निर्णय मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे शुक्रवारी (ता. ८) पार पडलेल्या प्रदेश, विभागीय, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यात आला.
भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विसर्जित

अकोला - लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भक्कम जनाधार मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप-बहुजन महासंघाला विसर्जित करण्यात आले आहे. यासंबंधिचा निर्णय मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे शुक्रवारी (ता. ८) पार पडलेल्या प्रदेश, विभागीय, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यात आला. 

विशेष म्हणजे भारिप-बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन होणार असल्याचे भाकीत ‘सकाळ’ने २ नोव्हेंबरच्या अंकातच व्यक्त केले होते. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली होती.

राज्याच्या राजकारणात तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. सर्व जागांवर निवडणूक लढवित ४२ लाखांवर मतंही वंचित बहुजन आघाडीने घेतली. एकही खासदार निवडून आला नसला तरी मिळालेल्या मतांनी आत्मविश्‍वास वाढलेल्या ‘वंचित’ने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यानच्या काळात वंचितमधील एक-एक तारा गळत गेला. परिणामी विधानसभा निवडणुकीत पाटी कोरी राहली. त्यातच लोकसभेच्या तुलनेत मतही घटले. असे असले तरी भारिप-बमसंच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्याच्या सीमा ओलांडत राज्यात तिसरा पर्याय उभा करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे भारिप-बमसं वंचित बहुजन आघाडीमध्ये विसर्जन करण्यात आला. 

शुक्रवारी (ता. ८) मुंबई येथे वंचित, भारिपच्या प्रदेश, विभागीय, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी यासंबंधी घोषणा केली. बैठकीत डॉ. अरुण सावंत, अशोक सोनोने, रेखा ठाकूर, राजेंद्र पातोडे, धनराज वंजारी, माजी आमदार बळीराम सिरस्कार, धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती सिरसाट व जवळपास १५ हजार कार्यकर्ता उपस्थित होते. 

वंचितच्या कार्यकारिणात होणार बदल
भरिप-बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात येईल. काही ठिकाणी हा बदल अंशतः तर काही ठिकाणी पूर्णतः असेल. भारिप-बमसं वंचितमध्ये विसर्जित झाल्यानंतर आता भारिप-बमसंच्या सर्व कार्यकारिण्या बरखास्त झाल्याची घोषणासुद्धा मुंबई येथे पार पडलेल्या सभेत करण्यात आली. 

दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात वंचित व भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेश, विभागीय, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भारिप-बमसं वंचितमध्ये विसर्जित केल्याची जाहीर घोषणा केली. त्यामुळे काही ठिकाणी वंचितच्या कार्यकारिणीत अंशतः व पूर्णतः बदल अपेक्षित आहे. 

- राजेंद्र पातोडे, 
प्रदेश प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com