प्रकाश आंबेडकर जिंकले, संजय धोत्रे हरले !

यामुळे भाजपचा पराभव - शिवसेनेना स्वतंत्र लढल्याने मतविभाजन - राज्यातील सत्ता गेल्याने भाजप ऐवजी शिवसेनेला मतदारांची पसंती - शहरी पक्ष म्हणून असलेली ओळख पुसता आली नाही - पक्षांतर्गत मतभेदाचा फटका
ambedkar-dhotre
ambedkar-dhotre

अकोला :   लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राजकीय डावपेचापुढे वंचित बहुजन आघाडी अर्थात भारिप बहूजन महासंघ जिल्ह्यातील कायमचा संपला अशीच चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेना दूर गेल्याने झालेल्या मतविभाजनाचा फटका अकोला जिल्ह्यात भाजपला बसला.


 यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना मोठा फटका बसला तर वंचितचे नेते   प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग अद्यापही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जाऊ शकतो हे दाखवून राजकीय डावपेचात विजय मिळविला आहे.
गेली 20 वर्षे सतत जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवित ठेवताना सातत्त्याने प्रकाश  आंबेडकर यांच्या पक्षावर ग्रामीण भागाच्या विकासाला खिळ बसविल्याचा आरोप होत आला. सत्तेच्या राजकारणात जिल्ह्यात भारिप-बमसंला रोखण्याचे आव्हान चार आमदारांच्या बळावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी स्वीकारले होते.  त्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला.


 मात्र शिवसेनेची सोबत सुटल्यानंतर ग्रामीण भागातील मतविभाजन टाळण्यच्या आव्हान त्यांना पेलविले नाही. यालट केंद्र व राज्यात एकही खासदार, आमदार नसतानाही केवळ जातीय  समिकरणे जुळवून आणत जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सर्वांत मोठा पक्ष होण्याची किमया वंचित बहुजन आघाडी व भारिप-बमसंने अकोला जिल्ह्यात करून दाखविला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता स्थापन करताना आता समविचारी पक्षांना सोबत घेण्याचे आव्हान वंचितच्या नेत्यांपुढे राहील.

यामुळे भाजपचा पराभव
- जिल्ह्यात जातीय समिकरण विपरित
- शिवसेनेना स्वतंत्र लढल्याने मतविभाजन
- राज्यातील सत्ता गेल्याने भाजप ऐवजी शिवसेनेला मतदारांची पसंती
- शहरी पक्ष म्हणून असलेली ओळख पुसता आली नाही
- पक्षांतर्गत मतभेदाचा फटका
- जवळच्या व्यक्तींना उमेदवारी देताना भाजपच्या कार्यकर्त्यांना डावल्याची भावना  
- पार्सल उमेदवारांची मोठी संख्या    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com