अस्तित्व टिकवण्यासाठी माने यांना शिवसेनेबरोबर जाण्याचे स्टेटमेंट करावे लागते - प्रकाश आंबेडकर

अस्तित्व टिकवण्यासाठी माने यांना शिवसेनेबरोबर जाण्याचे स्टेटमेंट करावे लागते - प्रकाश आंबेडकर

सातारा : विधानसभा निवडणुकीत एमआयएम आमच्या सोबतच आहे. त्यांचे प्रमुख असुउद्दीन ओवसी हेच निर्णय घेतात. त्यामुळे ही युती कायम राहील, दोन व्यक्ती गेल्याने वंचित आघाडीला फारसा फारक पडत नाही. लक्ष्मण माने आमच्यातून गेले याचे दु:ख आहे. वाईट याचे वाटते की आपले अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांना शिवसेनेत जाण्याचे स्टेटमेंट करावे लागते, अशी टीका वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज कऱ्हाडात केली. 

प्रकाश आंबेडकर आज वंचित आघाडीच्या मेळाव्यासाठी कऱ्हाडात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कॉंग्रेसला आम्ही 144 जागा तुम्ही लढा, उर्वरित 144 जागा आम्ही लढतो, अशी ऑफर दिली होती. पण या ऑफरला हात लावला तर जे 40 जण निवडणुकीच्या यादीत आहेत. ते अडकण्याची शक्‍यता आहे, अशी धमकी भाजपने कॉंग्रेसला दिली. त्यामुळे कॉंग्रेसने आम्हाला उत्तर दिले नाही. आता तर ते भेटायलाही टाळत आहेत. 

एमआयएमच्या जाण्याने वंचित आघाडीत फुट पडली अशी बोलले जात आहेत, या प्रश्‍नावर ते म्हणाले, एमआयएम आमच्यासोबतच आहे. त्यांचे प्रमुख आसुउद्दीने ओवसी हेच निर्णय घेतात. त्यामुळे ही युती कायम राहिल. दोन व्यक्ती गेल्याने फारसा फारक पडत नाही. लक्ष्मण माने आमच्यातून गेले याचे दु:ख आहे. वाईट वाटतेयं की आपले अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांना शिवसेनेत जाण्याचे स्टेटमेंट करावे लागते. काही जणांचे बिझनेस असतात त्यावर बोट ठेवण्याचा हा भाग असल्याचे दिसते. कोळसे पाटील गेले हेही वाईट आहे. ते जनता दलात होते, वंचितमधून ते गेले असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही. मुळात जनता दल आणि एमआयएम एकत्र बसूच शकलेले नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com