Prakash Ambedkar Asosuddin Owaisi in Kolhapur | Sarkarnama

प्रकाश आंबेडकर - ओवेसींच्या तोफा कोल्हापुरात  मंगळवारी धडाडणार 

सरकारनामा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

शिवाजी स्टेडीयमवर मंगळवारी दुपारी तीन वाजता मेळावा होईल.

कोल्हापूर :  वंचित बहुजन आघाडी तर्फे येत्या मंगळवारी (ता.12) ला 'सत्ता संपादन मेळावा' घेण्यात येणार आहे. माजी खासदार प्रकाश आंबेडकर, खासदार बॅ. असुदद्दीन ओवेसी व माजी आमदार लक्ष्मण माने आदीच्या मार्गदर्शन मेळाव्यात होणार आहे. येथील शिवाजी स्टेडीयमवर दुपारी तीन वाजता मेळावा होईल. एक लाख कार्यकर्ते येणार असल्याचा दावा आघाडीच्या स्थानीक नेत्यांनी पत्रकारव्दारे केला आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ता बदलण्यासाठी विविध पक्षाची एकत्र मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार रिपब्लिकनचे काही गट, बहुजन पार्टी, मुस्लीम संघटना तसेच भटके विमुक्त तसेच कष्ठकऱ्यांच्या चळवळीतील नेते एकत्र आणून सर्व संघटीत बळावर निवडणूक लढविण्यात येणार आहे. 

त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी येथील स्थानीक नेते त्यांच्या संघटना एकमेकांसोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा विचार होत आहे. त्याचाच भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत याचाच भाग म्हणून मेळावा होत आहे यात माजी आमदार लक्ष्मण माने यांची उमेदवारी जाहिर होण्याची शक्‍यता आहे.

या मेळाव्यात राज्यातील कामगार, कष्ठकरी तसेच रिपब्लिकन चळवळीशी संबधीत अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत यात प्रा. सुकूमार कांबळे, स्वागताध्यक्ष ऍड. इंद्रजीत कांबळे, अस्लम मुल्ला, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया कांबळे, भारीपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, माजी मंत्री दशरथ भांडे, एमआयएमचे अकील मुजावर, सुरेश शेळके आदी उपस्थित रहणार आहेत .

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख