prakash ambedkar announces 36 candidates | Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांनी जातींसह 36 उमेदवार जाहीर केले...धनगरांना सर्वाधिक संधी

राजू सोनवणे
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची 36 उमेदवारांची यादी आज त्यांच्या जातींसह जाहीर केली. तब्बल ३६ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक सहा धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची 36 उमेदवारांची यादी आज त्यांच्या जातींसह जाहीर केली. तब्बल ३६ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक सहा धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सर्वाधिक सहा धनगर उमेदवार आंबेडकर यांनी जाहीर केले आहेत. एकूण २१  विभिन्न जातीच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या यादीत प्रकाश आंबेडकरांचे स्वतःचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही बौद्ध चार, भिल्ल दोन, माळी दोन, बंजारा दोन, मुस्लीम दोन, कोळी दोन, कुणबी दोन,  तर वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार व विश्वकर्मा या जातीतील एका उमेदवाराला संधी मिळाली.

उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे 

1. धनराज वंजारी -वर्धा
2. किरण रोडगे -रामटेक
3. एन.के.नान्हे - भडांरा-गोंदिया
4. रमेश गजबे -गडचिरोली(चिमूर)
5.राजेंद्र महाडोळे-चंद्रपूर 
6.प्रवीण पवार -यवतमाळ(वाशीम) 
7.बळीराम सिरस्कार -बुलढाणा 
8. गुवणंत देवपारे-अमरावती 
9.मोहन राठोड-हिंगोली 
10.यशपाल भिंगे-नांदेड 
11.आलमगीर खान अखिल मोहम्मद खान-परभणी 
12.विष्णू जाधव-बीड 
13.अर्जुन सलगर-उस्मानाबाद 
14.राम गारकर-लातूर 
15.अजंली बावीस्कर-जळगाव 
16.नितीन कांडेलकर-रावेर 
17. शरदचंद्र वानखेडे-जालना 
18.सुमन कोळी-रायगड 
19.अनिल जाधव-पुणे 
20.नवनाथ पडळकर-बारामती 
21.विजय मोरे-माढा 
22.जयसिंग शेंडगे-सांगली 
23.सहदेव एवळे-सातारा 
24.मारूती जोशी-(रत्नागिरी-सिंधुदुर्ग) 
25.अरूणा माळी-कोल्हापूर 
26.अस्लम बादशाहजी सय्यद-हाताकंगले 
27.दाजमल गजमल मोरे-नंदुरबार 
28.बापू बर्डे-दिंडोरी 
29.पवन पवार-नाशिक 
30.सुरेश पडवी-पालघर 
31.ए.डी.सावंत-भिवंडी 
32.मल्लिकार्जुन पूजारी-ठाणे 
33. अनिल कुमार-मुंबई साउथ दक्षिण 
34.संजय भोसले-मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य) 
35.संभाजी शिवाजी काशीद-ईशान्य मुंबई 
36.राजाराम पाटील-मावळ 
37.अरूण साबळे-शिर्डी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख