prakash ambedkar and vanchit | Sarkarnama

वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या पन्नास जागा लढवणार - ऍड. प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

औरंगाबाद : देशातील राजकीय परिस्थिती बदलायला हवी, हा बदल अनेकांच्या पचनी पडणार नसला तरी तो घडायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करतांनाच वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या पन्नास जागा लढवणार असल्याची घोषणा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये केली. ओबीसी हक्क परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आज (ता. 14) औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक आणि देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, कॉंग्रेस सोबत आघाडीची बोलणी सुरू आहे. आमचा प्रस्ताव कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना दिला आहे, यावर आता त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघात कोणत्या समाजाचा उमेदवार असेल हे मी जाहीर करणार आहे. उमेदवाराचे नाव सांगणार नाही, पण पुढे त्यांना निवडून आणण्याच काम तुमचं असेल. राजकारण हे केवळ निमित्त आहे, खरा लढा धर्माच्या ठेकेदारांशी असल्याचे सांगतांनाच धर्माच्या नावाने सुरू असलेली लूट थांबली पाहिजे, सगळ्या गोष्टी सार्वत्रिक व्हायला हव्या अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली. 

मंदिराच्या पैशातून ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण द्या.. 
ओबीसींच्या मुलांना शिक्षणासाठी आरक्षणनिहाय प्रवेश होत नाही. त्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसा नसेल तर तो राज्यातील देवस्थांनांकडुन घ्या. देवस्थानांचा पैसा लोकहितासाठी वापरण्यात गैर नाही. सरकार पाचशे कोटी शिर्डी संस्थानकडून इतर कामांसाठी घेऊ शकते. ओबीसी मुलांच्या शिक्षणासाठी हा पैसा का घेत नाही असा सवाल करतांनाच ते पुढे म्हणाले, यामुळे देवस्थानांच्या गंगाजळीतून एक प्याला दिल्या सारखे होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख