prakash ambedkar and congress news anylysis | Sarkarnama

  "एमआयएम' नको, पण, प्रकाश आंबेडकरांचे करायचे काय ? कॉंग्रेसला प्रश्‍न 

उमेश घोंगडे 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांना प्रकाश आंबेडकर यांचा असलेला पारंपरिक विरोध. आंबेडकरांसोबत असलेली "एमआयएम' कॉंग्रेसला नकोशी आहे. मात्र आंबेडकरांना महाआघाडीत घ्यायला हवेच, अशा विचित्र परिस्थितीत कॉंग्रेस सापडली असून आंबेडकरांबाबत नेमके काय करायचे या संभ्रमात कॉंग्रेसचे पक्षनेतृत्व अडकले आहे. 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांना प्रकाश आंबेडकर यांचा असलेला पारंपरिक विरोध. आंबेडकरांसोबत असलेली "एमआयएम' कॉंग्रेसला नकोशी आहे. मात्र आंबेडकरांना महाआघाडीत घ्यायला हवेच, अशा विचित्र परिस्थितीत कॉंग्रेस सापडली असून आंबेडकरांबाबत नेमके काय करायचे या संभ्रमात कॉंग्रेसचे पक्षनेतृत्व अडकले आहे. 

शरद पवार धर्मनिरपेक्ष असले तरी त्यांचा पक्ष तसा नाही, असे विधान करून आंबेडकरांनी चर्चेला वळण दिले. त्यामुळे पवार यांनीही अकोल्यात लोकसभा निवडणुकील दोन वेळा राष्ट्रवादीचा पाठींबा कसा चालला, असा प्रश्‍न आंबेडकरांना केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे मूळ विषय बाजूला पडला आहे. गेल्या वर्षभरात भिमा कोरेगाव प्रकरणानंतर आक्रमक झालेले आंबेडकर व त्यांना राज्यभरातून मिळालेला पाठिंबा यामुळे आंबेकरांचे राजकीय महत्व वाढले आहे. त्यामुळे पुन्हा सत्तेत यायचे असेल तर आंबेडकरांना सोबत घ्यायलाच हवे, अशी कॉंग्रेस पक्षनेतृत्वाची भूमिका आहे. 

काहीही झाले तरी आंबेडकरांना सोबत घ्यायचेच अशी दिल्लीतील वरिष्ठांनी ठरवले असल्याचे राज्य पातळीवरील नेतृत्वाला या आदेशाबहहुकूम काम करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र आंबेडरांसोबत असलेल्या "एमआयएम'मुळे गेल्या काही निवडणुकांत कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची भावना पक्षात प्रभावी आहे. "एमआयएम' हा भारतीय जनता पार्टीप्रमाणेच टोकाचा जातीयवादी पक्ष असल्याचे कॉंग्रेसच्यावतीने वारंवार सांगण्यात येते.त्यामुळे कॉंग्रेसला आंबेडकर हवेत मात्र त्यांच्यासोबत येणाऱ्या "एमआयएम'ला टोकाचा विरोध आहे. 

या पार्श्‍वभूमीवर आंबेडकरांबाबत पक्षातील वरिष्ठ दिल्लीत निर्णय घेणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. येत्या काही दिवसात याबाबत आंबेडकर यांच्याशी चर्चा करून अंतीम निर्णय होणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले. 

शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसला आंबेडकरांचा विरोध आहे. त्यांचा हा विरोध अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी व शरद पवार यांच्याबाबत थेट विधान केले आहे. त्यामुळे राजकीय सोय म्हणून राष्ट्रवादीला आंबेडकरांबाबत फारसा आक्षेप राहणार नाही. मात्र आंबेडकरांना राष्ट्रवादीबाबत असलेला आक्षेप कायम आहे. त्यामुळे यातून मार्ग काढताना कॉंग्रेसला आंबेडकरांसाठी आपल्या कोट्यातून जागा द्याव्या लागण्याची शक्‍यता अधिक आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख