चार राज्यातील पराभवानंतर राम मंदिराची आठवण - प्रकाश आंबेडकर

चार राज्यातील पराभवानंतर राम मंदिराची आठवण - प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला राम मंदिराची आठवण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येवो अथवा न येवो 21 फेब्रुवारीला अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करणार असल्याचे मोहन भागवत यांनी जाहीर केल्याचे सांगत राम मंदिराच्या मुद्यावरूनच देशभरात जातीय दंगली करण्याचा भाजपचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप भारिपचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना केला. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे करून देशभरात दंगली घडवण्यात येणार असल्याची भिती जागतिकस्तरावरील गुप्तचर संस्थेने व्यक्त केली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आण समविचारी पक्षांच्या वतीने 21 फेब्रुवारीपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शांती यात्रा काढून जातीय सलोखा कायम राहावा आणि कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करमार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. 

जिल्ह्यातील प्रत्येक सामाजिक घटक, संघटना स्वत: फलकावर लिहून "आमच्या जिल्ह्यात जातीय दंगल होऊ देणार नाही' अशी ग्वाही देणार आहेत. नुकतेच कल्याण येथील भाजप कार्यकर्त्याच्या घरात शस्त्रसाठा सापडला होता. मात्र त्याची चौकशी दडपण्यात आली. भारतीय गुप्तचर यंत्रणेने असाच अहवाल सरकारकडे सादर केला मात्र तो अहवाल समोर आला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, संमिश्र सरकार सत्तेवल येईल असा दावा करून ते पुढे म्हणाले म्हणूनच भाजपने प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा सपाटा लावला आहे. 

संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणा.. 
वंचित बहुजन आघाडीची कॉंग्रेस सोबतची चर्चा जागा वाटपावरून थांबली नाही तर कॉंग्रेसने "आरएसएस' ला संवैधानिक चौकटीत आणण्याचा मान्य न केल्यामुळे थांबल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस आघाडीची चर्चा करण्यात आली, मात्र कॉंग्रेस आरएसएस संदर्भात काही बोलत नाही, त्यांना संवेधानिक चौकटीत आणण्याचा अजेंडा आणत नाही. तो अजेंडा आणल्यानंतरच आम्ही आमचा आरखडा त्यांना देऊ आणि जागा वाटपा संदर्भात चर्चा करु. कॉंग्रेस ज्या जागांवर गेल्या अनेक वर्षापासून पराभूत होत आली आहे त्याच जागा आम्ही मागितल्या असल्याचा पुनरूच्चार देखील आंबेडकरांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com