prakash aambedkar on maratha reservation | Sarkarnama

अर्थिक निकषांची चर्चा मराठा आरक्षणाची हवा काढण्यासाठी : आंबेडकर 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

नंदुरबार : घटनेत बदल केल्यानंतर देशात आर्थिक निकषावर आरक्षण देणे शक्‍य होईल. घटनेत जातीला आरक्षण देण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेली चर्चा हा स्टंट आहे, असे मत भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

श्री. आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले, की कोणाला आरक्षण द्यायचे नसले की आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे केला जातो. यापूर्वी शरद पवार यांनीही असाच मुद्दा रेटला होता. सध्याच्या कायद्यानुसार आर्थिक निकषावर आरक्षण देणे शक्‍य नाही. केंद्राने आर्थिक निकषाबाबत चर्चा करणे, हा राज्यातील मराठा आरक्षणाची हवा काढण्याचा प्रकार आहे. 

आरक्षणाबाबत श्री. आंबेडकर यांनी पुढे सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विषयाला स्थगिती दिली आहे. त्यावर नव्याने आरक्षण आणू शकत नाही. मेगा भरतीत 16 टक्के जागा आरक्षित ठेवता येत नाहीत. शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यावर त्यांनी आपली भूमिका आणि पाठिंबा यात फरक आहे, याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले. आंदोलन असले की पाठिंबा द्यायचा, हे अयोग्य आहे. राज्यात सुरू असलेले राजीनामा सत्र फसवे आहे. राजीनामा द्यायचा असेल तर तो विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख