राळेगणसिद्धीच्या धर्तीवर राज्यात लवकरच सोलर प्रकल्पांची उभारणी : तनपुरे

राळेगणसिद्धीच्या धर्तीवर राज्यात लवकरच सोलर प्रकल्पांची उभारणी : तनपुरे

राळेगणसिद्धी : राळेगणसिद्धी येथील सोलर प्रकल्प हा पथदर्शी असून, तो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. राज्यात यापुढे असे प्रकल्प मोठ्या स्वरूपावर राबविण्यात येतील, असे तनपुरे या वेळी सरकारनामा शी बोलताना सांगितले. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सायंकाळी उशीरा राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा कशी वीज देता येईल, याची चर्चा केली. 

संघटित कामाचे यश 
राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ही दोन गावे संघटितपणे एकत्र येऊन काम करतात म्हणून त्यांना असे प्रकल्प करताना अडचणी येत नाहीत. परंतु अनेक गावांत पक्ष-पार्ट्या यांच्यात मतभेद असतात. त्यामुळे त्या गावांना यशस्वी गावांच्या गोष्टी सांगितल्या, तर तिथे असे प्रयोग यशस्वी होतील. पडीक जमिनींवर असे प्रयोग आपल्याला राज्यभर राबविता येतील, असे या वेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तनपुरे यांच्याशी लेखी चर्चा करताना म्हणाले. 

आपल्या देशाला निसर्गाची देणगी 
पर्यावरणाबाबत जगातील जाणकार नेते चिंताग्रस्त झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी पॅरिस येथे जागतिक परिषद झाली होती. आणि त्या परिषदेत जगातील सर्व नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. आपल्या देशाला निसर्गाची चांगली देणगी आहे. त्याचा योग्य वापर केला, तर देशातील विजेचा प्रश्न संपून जाईल. तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने उपयोग करून घेतला, तर निसर्गाचे शोषण न करता आपण निसर्गाने जसे दिले आहे, त्या देणगीचा उपयोग करून स्वावलंबी होऊ शकतो, अशा सूचना हजारे यांनी केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com