Prahar Preparing for Yavatmal Vashim | Sarkarnama

यवतमाळ-वाशीम मधून 'प्रहार'ची तयारी; वैशाली येडेंना उमेदवारी देण्याची शक्‍यता

अतुल मेहेरे
गुरुवार, 21 मार्च 2019

आपल्या वैविध्यपूर्ण आंदोलनांसाठी सर्वदूर परीचित असलेले आमदार बच्चू कडू यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला उमेदवारी देउन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. वैशाली येडे यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. या शिवायही काही नावे विचाराधीन असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

नागपूर : आपल्या वैविध्यपूर्ण आंदोलनांसाठी सर्वदूर परीचित असलेले आमदार बच्चू कडू यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला उमेदवारी देउन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. वैशाली येडे यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. या शिवायही काही नावे विचाराधीन असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

"या संदर्भात सर्वांकडून आम्ही अभिप्राय मागितले आहेत. आज संध्याकाळपर्यंत आमचा निर्णय होणार आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या यवतमाळ जिल्यात सर्वाधिक आहे. देशात नेहमीच हा विषय चर्चिल्या गेला आहे. पण त्यावर ठोस उपाय मात्र अद्याप केला गेले नाहीत. यातून शेतकऱ्यांच्या जटील प्रश्‍नांवर चर्चा घडवून आणणे आणि त्यांवर उपाययोजना करण्याचा प्रहारचा प्रयत्न आहे. विदर्भातून एकमेव यवतमाळ-वाशीम याच मतदार संघातून आणि केवळ शेतकऱ्यांचे प्रश्‍न समोर आणण्यासाठी आम्ही लढणार आहोत, ईतरत्र कुठेही आम्ही लढणार नाही," असे ते म्हणाले.

या मतदार संघातून कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि भाजपा-शिवसेना युतीच्या भावना गवळी हे बलाढ्य उमेदवार लढत आहेत. याशिवाय वंचित बहूजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार पण आहेत. अशा परीस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या एका सामान्य कुटुंबातील महीला प्रहारकडून लढणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरु असलेला प्रहारचा संघर्ष या निवडणुकीत काय परिणाम साधला जातो, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख