Prahar Party workers protested at Telhara tehsil | Sarkarnama

प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तेल्हारा बीडीओंच्या तोंडाला फासले काळे 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

तेल्हारा तालुक्‍यातील घरकुल, अपंग लाभार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) फाडके यांच्या तोंडाला काळे फासून प्रशासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणांचा निषेध केला. या आंदोलनामुळे पंचायत समिती आवारात एकच खळबळ उडाली. 

अकोला : तेल्हारा तालुक्‍यातील घरकुल, अपंग लाभार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) फाडके यांच्या तोंडाला काळे फासून प्रशासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणांचा निषेध केला. या आंदोलनामुळे पंचायत समिती आवारात एकच खळबळ उडाली. 

तालुक्‍यातील अनेक गावातील घरकुल आणि अपंग लाभार्थ्यांचे प्रश्न पंचायत समितीस्तरावर प्रलंबीत आहेत. ग्रामीण भागातील घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण करून योग्य लाभार्थी सर्वेत समाविष्ट करावे, अपंगांचा पाच टक्के निधी वितरीत करावा, ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्त करावे, चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळेच्या पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे अशा मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आली. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही न करता गटविकास अधिकारी फाडके लाभार्थी असलेल्या अपंग, विधवा महिलांना अशब्द बोलत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांनी केला. 

गोरगरीब लाभार्थ्यांच्या मागण्या न सोडविता अधिकाऱ्यांकडून केवळ टोलवा-टोलवी होत असल्याने बुधवार (ता.19) प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत लाभार्थ्यांचे प्रश्न निकाली काढण्याची मागणी रेटून धरली. मात्र, अधिकाऱ्यांकडून उडवा-उडवीचे उत्तरे मिळत असल्याने संप्तत झालेले जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून तीव्र आंदोलन केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख