‘प्रहार’चे नेते तुषार पुंडकर यांचा गोळीबारात मृत्यू

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवारी रात्री उशीरा अज्ञातांनी गोळीबार केला. त्यात सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे​
Prahar Leader Tushar Pundkar Dies in Firing
Prahar Leader Tushar Pundkar Dies in Firing

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवारी रात्री उशीरा अज्ञातांनी गोळीबार केला. त्यात सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. अकोट शहरातील पोलिस वसाहतीमध्ये ही घडना घडली. त्यात तुषार पुंडकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार नाजुकराव पुंडकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने अकोट येथे गोळीबार केला. त्यांच्या पाठीमध्ये दोन गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. 

उपस्थित नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. या घटनेमुळे अकोट शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू होता. हल्लेखोर कोण आहेत, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्ल्याचे कारणही रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. हल्लेखोरांना देशी कट्ट्याचा वापर केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाठलाग करून गोळ्या झाडल्या

अकोट शहरातील पोलिस वसाहतीजवळ असलेल्या दूध डेअरीजवळ असताना तुषार पुंडकर यांना हल्ल्याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी प्राण वाचविण्यासाठी जीवाच्या आकांताने जवळच असलेल्या पोलिस वसाहतीकडे धाव घेतली. आरोपींनी पाठलाग करून पुंडकर यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. त्यात दोन गोळ्या पुंडकर यांच्या पाठीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी रात्री ११.३० वाजता अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सकाळी त्यांचा मृत्यू झाला

पालकमंत्री बच्चू कडू, आमदार, राजकीय नेत्यांची रुग्णालयात धाव

तुषार पुंडकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना आमदार नितीन देशमुख,  मध्यरात्रीनंतर पालकमंत्री बच्चू कडूही रुग्णालयात दाखल झाले. तुषार पुंडकर यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षकसही रुग्णालयात उपस्थित होते. प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयात उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com