डॅशींग बच्चू कडू मंत्री होणार असल्याच्या चर्चेने पदाधिकाऱ्यांचा जल्लोष!

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नगरमार्गे मुंबईकडे जात असताना महामार्गावरील पिंपरी (ता. इगतपुरी) येथील विश्रामगृहात तालुक्‍यातील प्रहार अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध प्रश्‍नांवर चर्चा केली.
Prahad MLA Bacchu Kadu Felicitated by Party Workers
Prahad MLA Bacchu Kadu Felicitated by Party Workers

नाशिक : मंत्रीमंडळ विस्तारात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांचे नाव चर्चेत आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक येथे भेटलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी नोकऱ्यांविषयी चर्चा केली असता, कडू म्हणाले, "नोकऱ्या न देणाऱ्यांबाबत माझ्याकडे जालीम उपाय आहे. मग बघा नोकऱ्या कशा मिळत नाहीत.''

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नगरमार्गे मुंबईकडे जात असताना महामार्गावरील पिंपरी (ता. इगतपुरी) येथील विश्रामगृहात तालुक्‍यातील प्रहार अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. या वेळी मंत्रिपदाबाबत विचारले असता, ते म्हणाले, " मला बोलावणे आले आहे. बघु काय होते ते,'' असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

बच्चू कडू सलग चौथ्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. यंदा त्यांनी निकाल लागताच शिवसेनेला पाठींबा जाहीर केला. त्या नंतरच्या घडामोडींत राज्यात भाजपचे फासे उलटे पडले. महाविकास आघाडी स्थापन झाली. सरकारचा मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. याविषयी कडू यांनी वरिल प्रतिक्रीया व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांनी इगतपुरी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असूनही नोकरीत स्थानिकांना डावलण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर "थोडे थांबा, माझ्याकडे यावर जालीम उपाय आहे,'' असे कडू यांनी सांगितले.

आमदार कडू यांची प्रहार संघटना दिव्यांग बांधवांसाठी आक्रमकपणे काम करीत आहेत. आता ते स्वतःच मंत्री झाले तर या योजना तडीस नेण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी लागतील, असे कार्यकर्त्यांना वाटते. त्यांनी राज्यातील अपंग वित्त महामंडळाकडे निधी नसल्याने कर्जमागणीची हजारो प्रकरणे पडून आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करून प्रश्‍न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अवकाळी पाऊस, नुकसानभरपाई, पीककर्जमाफी आदींबाबतही या वेळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले.

यावेळी संघटनेचे संपर्कप्रमुख दत्तू बोडके, समन्वयक गोपाळ शिंदे, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, सरचिटणीस नितीन गवळी, शहराध्यक्ष श्‍याम गोसावी, नितीन गवळी, सपनसिंग परदेशी, संतोष मानकर, नितीन गोसावी, संतोष चव्हाण, पवन रुपवते व दीपक अग्रवाल उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com