प्रफुल्ल पटेलांचे नाना पटोले यांना मनाचे पान 

मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा कार्यक्रम प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी विशेष असतो. यावर्षी या महत्त्वाच्या कार्यक्रमाला नाना पटोले यांना पाचारण करून पटोले यांच्यापुढे मानाचे पान पुढेकेले.
patole-patel.
patole-patel.

गोंदिया:  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांची नौका कॉंग्रेस नेते नाना पटोले पार करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

येत्या 9 फेब्रुवारीला होणाऱ्या गोंदियात होणाऱ्या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत कॉंग्रेसचे नेते नाना पटोले विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एकेकाळी हे दोन्ही नेते कट्टर विरोधक म्हणून जिल्ह्यात ओळखले जात होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. जिल्ह्याच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल व नाना पटोले यांचे वैर सर्वश्रूत होते. नाना पटोले यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मात्र भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे राजकारण बदलले आहे. पटोले यांनी प्रचारात पुढाकार घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांना विजयी केले. 

या विजयाने नाना पटोले यांच्या संघटनात्मक कौशल्य व जनमतावर असलेल्या प्रभावाची जाणीवही प्रफुल्ल पटेल यांना झाली. या दोन्ही जिल्ह्यातील कुणबी समाजाचे नेते म्हणून नाना पटोले आता सर्वमान्य झाले आहे. याचा फायदा प्रफुल्ल पटेल यांना येत्या निवडणुकीत मिळणार आहे.

पटोले यांची साथ कायम राहावी, यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी येत्या 9 फेब्रुवारीला गोंदियात आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ येणार आहेत. मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा कार्यक्रम प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी विशेष असतो. यावर्षी या महत्त्वाच्या कार्यक्रमाला नाना पटोले यांना पाचारण करून पटोले यांच्यापुढे मानाचे पान पुढे केल्याचे स्पष्ट संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com