प्रदीप रावत नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष! 

पक्षनिष्ठेला भारतीय जनता पक्षामध्ये फळ मिळते, याचा प्रत्यय शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा आला. पक्षाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप रावत यांची "नॅशनल शिपिंग बोर्डा'च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. "माझ्यावर दाखविलेला विश्‍वास अतोनात कष्ट करून सार्थ करून दाखविणार आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी "सरकारनामा' बोलताना व्यक्त केली आहे.
प्रदीप रावत नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष! 

पुणे : पक्षनिष्ठेला भारतीय जनता पक्षामध्ये फळ मिळते, याचा प्रत्यय शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा आला. पक्षाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप रावत यांची "नॅशनल शिपिंग बोर्डा'च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. "माझ्यावर दाखविलेला विश्‍वास अतोनात कष्ट करून सार्थ करून दाखविणार आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी "सरकारनामा' बोलताना व्यक्त केली आहे. 

नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्षपद एक महत्त्वाचे पद समजले जाते. त्या पदावर नियुक्ती झाल्याची "बातमी' रावत यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनच शुक्रवारी समजली. त्याबाबतचे नियुक्तीचे पत्र त्यांना पाठोपाठ मिळाले. नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना रावत म्हणाले, ""वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे वाहतुकीचे बहुविध पर्याय शोधणे आता गरजेचे झाले आहे. हवाई वाहतुकीचा पर्यात काहीसा महागडा आहे. रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या तुलनेत जलवाहतूक स्वस्त आहे. आगामी काळात जलवाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. त्या दृष्टिने नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे.'' या पदावर काम करू शकेल, यासाठी गडकरी यांनी जो विश्‍वास व्यक्त केला, तो आता सार्थ करून दाखविण्याची जबाबदारी आहे. त्यादृष्टिने अतोनात कष्ट करून ही जबाबदारी पार पाडणार असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. 

रावत हे 1999 ते 2004 दरम्यान खासदार होते. तत्पूर्वी पक्षाचे शहराध्यक्षही होते. "टेक्‍नोसॅव्ही' अशी रावत यांची प्रतिमा आहे. मधल्या काळात काही कारणांमुळे ते पक्षापासून मनाने दुरावले होते. परंतु, नियुक्ती झाल्यामुळे ते आता पुन्हा मूळ प्रवाहात आले आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com