pradip nimbalkar elected as chairman of chatrapati | Sarkarnama

छत्रपतीच्या अध्यक्षपदी प्रदीप निंबाळकर; उपाध्यक्ष पाटील यांचा राजीनामा

ज्ञानेश्वर रायते
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

भवानीनगर : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रदीप केशवराव निंबाळकर यांची आज बिनविरोध निवड झाली. दरम्यान छत्रपतीचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना राजीनामा देण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केली असून या जागेवर इंदापूर तालुक्यातीलच संचालकाची निवड होण्याची शक्यता आहे. 

कारखान्याच्या अध्यक्षपदाचा अमरसिंह घोलप यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. आज सकाळी साडेअकरा वाजता कारखान्याच्या संचालक मंडळ सभागृहात सहायक निबंधक एस.एस. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली.

या सभेपूर्वी राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर हे पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन आले होते. त्यांच्यासमवेत पंचायत समिती सदस्य भारत गावडे, विजय शिंदे, जितेंद्र काटे आदींनी संचालक मंडळाची भेट घेतली व संचालकांना अध्यक्षपदासाठी प्रदीप निंबाळकर यांच्या नावाची शिफारस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असल्याची माहिती दिली.

त्यानंतर कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंगाडे यांनी सूचक म्हणून अध्यक्षपदासाठी निंबाळकर यांचे नाव एकमताने सुचवले, त्यास संतोष ढवाण यांनी अनुमोदन दिले व एकच अर्ज अध्यक्षपदासाठी आल्याने निंबाळकर यांची निवड बिनविरोध झाल्याचे कुंभार यांनी जाहीर केले.

निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदिप निंबाळकर म्हणाले,` कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माझी निवड केल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो. मात्र निवड झाली असली तरी काळ कसोटीचा आहे. यातून उभारी घेण्याचे आव्हान निश्चितच आहे. मात्र यातच कौशल्य पणाला लावून काम करू. सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन काम करू. यापुढील काळात कारखान्यास आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.``

दरम्यान ही निवड होताच कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना पदाचा राजीनामा देण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्याचा निरोप संभाजी होळकर यांनी दिला. यापूर्वी अध्यक्षपदी घोलप व उपाध्यक्षपदी पाटील यांची निवड होताना एक ते सव्वा वर्ष असा कालावधी त्यावेळी जाहीर केला होता. मात्र त्याहून अधिक काळ घोलप व पाटील पदावर राहीले. आज पाटील यांना पदाचा राजीनामा देण्याची सूचना झाल्याने नवे उपाध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली. मात्र हे पद इंदापूर तालुक्यातच राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर अमोल पाटील, अॅड. लक्ष्मण शिंगाडे, गोपीचंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख