प्रदीप कंद यांचा बाबूराव पाचर्णे यांना पाठिंबा 

प्रदीप कंद यांचा बाबूराव पाचर्णे यांना पाठिंबा 

शिरूर ः जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आज माघार घेत, आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कंद म्हणाले, ""काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी पाचर्णे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे सर्व सहकाऱ्यांसह त्यांना पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. त्यांचा नेत्रदीपक विजय साकारून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा मान राखला जाईल.'' 

राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी शब्द देऊन उमेदवारी नाकारल्याची खंत नाही, पण दुसऱ्याला उमेदवारी देताना किमान विश्‍वासात घ्यायला हवे होते. विश्‍वासात घेण्याची देखील किंमत नसेल; तर तेथे राहायचे कशाला, असा सवाल कंद यांनी केला. 

नुकतेच भाजपमध्ये आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे व राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, युवा नेते संदीप भोंडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कटके, दादासाहेब कोळपे, भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शहर प्रमुख मयुर थोरात, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती माऊली वाळके, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धार्थ कदम, सदस्य आबासाहेब सरोदे, रासपचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, सरदवाडीचे सरपंच विलास कर्डिले आदी यावेळी उपस्थित होते. तुकाराम खोले यांनी आभार मानले. 

नवीन चेहऱ्यांना संधी देऊ, सांगणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने जुनेच चेहरे रिंगणात उतरविले आहेत. जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकारी केवळ नामधारी असून, अशोक पवार, दत्तात्रेय भरणे, रमेश थोरात व दिलीप मोहिते या चौकडीच्या ताब्यात पक्षाची सूत्रे आहेत. ही चांडाळ चौकडी नामशेष करण्याबरोबरच; जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला हद्दपार करण्याचा संकल्प केला आहे, असे जालिंदर कामठे यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com