Pradeep Sharma enters ShivSena, which politician is on his radar? | Sarkarnama

शिवबंधन बांधून प्रदीप शर्मा सज्ज, कोणाचे राजकीय एन्काउंटर करणार ? 

सुमीत सावंत 
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

.

मुंबई : पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत  प्रदीप शर्मा यांनी हातावर शिवबंधन बांधले व त्यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली आहे. आता पोलीस खात्यात आपली चमक दाखवल्या नंतर शर्मा राजकारणात किती एन्काउंटर करणार  याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत . 

प्रदीप शर्मा हे मुंबईतील एक पोलीस निरीक्षक आहेत. ते चकमकफेम म्हणून प्रसिद्ध आहेत. १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द नेहमीच वादात राहिली.

एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले होते तेव्हा चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांना संपवले.

प्रदीप शर्मा अबतक 100
प्रदीप शर्मा यांचा जवळपास 312 चकमकींमध्ये सहभाग होता. त्यांनी आजवर शंभरहून अधिक गुंडांचा एनकाऊंटरमध्ये खात्मा केला आहे, त्यांत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे.

प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप होता. लखनभैया बनावट चकमक प्रकरणी त्यांच्यावर 2008 साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

नोव्हेंबर 2006 मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील 13 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्माही होते. 2013 मध्ये मुंबईतील न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले होते.

प्रदीप शर्मा यांचे निलंबन नऊ वर्षांनी 2017 रोजी संपले आणि त्यांना त्याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त केले. मात्र त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी 4 जुलै 2019 रोजी तडकाफडकी राजीनामा दिला.

अशा या शर्मानी आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे शिवसेनकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता पण मतदारसंघ कोणता याबद्दल लवकरच येणाऱ्या निवडणूकी आधी कळेल. 

uddhav thackeray facebook साठी इमेज परिणाम

एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने  आज शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेत आहे . त्यांनी आजवर आपले कर्तव्य पार पाडले हे देखील कर्तव्य ते पार पाडतील, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

pradip sharma facebook साठी इमेज परिणाम

बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्यावर प्रभाव होता. बाळासाहेब ठाकरे यांचा मायेचा हात माझ्यासोबत होता. उद्धव साहेब मला भावासारखे आहेत. असे  प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत दाखल झाल्यानंतर सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख