Prachi Patil Vedantikaraje Takes Tea Together | Sarkarnama

प्राची पाटील व वेदांतिकाराजेंनी घेतला प्रेमाचा चहा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 मार्च 2019

काही दिवसांपूर्वी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व भाजपकडून इच्छुक असणारे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी एकत्र खाल्लेल्या मिसळीमुळे अनेकांना ठसका लागला.  त्यात भर म्हणून आज शिवेंद्रराजेंच्या पत्नी सौ.वेदांतिकाराजे भोसले व नरेंद्र पाटील यांच्या पत्नी सौ.प्राची पाटील या एका महिला दिनाच्या कार्यक्रमात एकत्र आल्या होत्या.  कार्यक्रमानंतर  दोघींनी एकत्र चहा घेतला. 'मिसळ'च्या झटक्यानंतर आज साताऱ्यात चहाचा गोडवा पाहायला मिळाला.

सातारा : काही दिवसांपूर्वी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व भाजपकडून इच्छुक असणारे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी एकत्र खाल्लेल्या मिसळीमुळे अनेकांना ठसका लागला.  त्यात भर म्हणून आज शिवेंद्रराजेंच्या पत्नी सौ.वेदांतिकाराजे भोसले व नरेंद्र पाटील यांच्या पत्नी सौ.प्राची पाटील या एका महिला दिनाच्या कार्यक्रमात एकत्र आल्या होत्या.  कार्यक्रमानंतर  दोघींनी एकत्र चहा घेतला. 'मिसळ'च्या झटक्यानंतर आज साताऱ्यात चहाचा गोडवा पाहायला मिळाला.

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सातारच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे दोन्ही राजांचा सत्ता संघर्षाचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत दिसणार यात शंका नाही. हे ओळखून पक्ष श्रेष्ठींनी अजूनपर्यंत सातारा लोकसभेचे  तिकीट कुणाला हे  जाहीर केले नाही. उदयनराजे हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे प्रबळ दावेदार असले तरी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे त्यांच्या तिकीटाच्या मधील प्रमुख अडसर आहेत. हे त्यांचे कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे व भाजप कडून इच्छुक असणारे माथाडी  कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी एकत्र खाल्लेली मिसळ चांगलीच गाजली होती.

आता त्यात भर म्हणून शिवेंद्रराजेंच्या पत्नी सौ.वेदांतिकाराजे भोसले व नरेंद्र पाटील यांच्या पत्नी सौ.प्राची नरेंद्र पाटील या एका महिला दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एकत्र आल्या त्यावेळी कार्यक्रम झाल्यावर त्यांनी एकत्र चहा घेतला. त्यानंतर प्राची पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ''साताऱ्याची मिसळ बऱ्याच जणांना लागली परंतु आज वेदांतिकाराजें सोबत प्यायलेला चहा ही एक वेगळी नांदी असेल.त्याच प्रमाणे सातारच्या जनतेला राजे महाराजांच्या गादीपेक्षा सर्व सामान्य नेतृत्व मिळावं असे वाटते. ज्या दिवशी नरेंद्र पाटील यांचे तिकीट फायनल होईल त्यानंतर साताऱ्याची गणिते बदलतील."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख