prabhakar gharge warns egoist leaders of man-khatav | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

चवथ्या फेरीत आदित्य ठाकरे 19954 मतांनी आघाडीवर....
दौंड (पुणे) मध्ये आमदार राहुल कुल ६३३९ मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरीअखेर धनंजय मुंडे 13 हजार मतांनी आघाडीवर
साताऱ्यातून उदयनराजे 32 हजार मतांनी पिछाडीवर
रोहित पवार आठव्या फेरीअखेर 12170 मतांनी आघाडीवर
येवला मतदारसंघ- छगन भुजबळ ३४७२ मतांनी आघाडी
मालेगाव बाह्य - शिवसेनेचे दादा भुसे 21 हजार 913 मतांनी आघाडीवर.
कुलाबा मतदार संघात भाजप चे राहुल नार्वेकर 7 हजार मतांनी आघाडीवर
चिंचवड - भाजपचे लक्ष्मण जगताप 7785 मताने आघाडीवर.
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

`माण-खटाव`मधील अहंकारी नेत्यांची गुर्मी उतरविणार`

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

दहिवडी : भूलथापांत माहीर असणाऱ्यांनी वडूजला स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून मते घेतली. सामान्य जनतेला कस्पटासमान समजणाऱ्या अहंकारी वृत्तीचा यावेळी बिमोड होणार असून ही निवडणूक त्यांची गुर्मी उतरवणारी ठरणार आहे, असा इशारा माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी विरोधकांना दिला.

दहिवडी : भूलथापांत माहीर असणाऱ्यांनी वडूजला स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून मते घेतली. सामान्य जनतेला कस्पटासमान समजणाऱ्या अहंकारी वृत्तीचा यावेळी बिमोड होणार असून ही निवडणूक त्यांची गुर्मी उतरवणारी ठरणार आहे, असा इशारा माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी विरोधकांना दिला.

वडूज येथे माण मतदारसंघातील  'आमचं ठरलंय'चे अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभाकर देशमुख, दादासाहेब गोडसे, प्रा. बंडा गोडसे, अशोकराव गोडसे, प्रा. अर्जुनराव खाडे, हिंदूराव गोडसे, नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, तानाजी बागल, डाॅ. विवेक देशमुख, विजय काळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार घार्गे म्हणाले अपप्रवृत्तीचा आळाबांधा करण्यात हुतात्म्यांची भूमी असलेला खटाव तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी एकच विचार व एकच दिशा निश्चित करु व 'टेबल' चिन्हावर भरघोस मतदान करु. कारण सध्याची निवडणूक ही आपल्यासाठी युध्दासारखी असून आपल्याला हे युद्ध जिंकायचेच आहे.

प्रभाकर देशमुख म्हणाले माण-खटावचा चेहरामोहरा बदलणारी, सन्मानाची व स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. मतदारसंघात परिवर्तन अटळ असून वाईट प्रवृत्ती गाडल्या जाणार आहेत. विरोधकांच्या साम, दाम, दंड भेद या सर्व आयुधांना `जशास तसे` उत्तर दिले जाणार आहे.

यावेळी माजी सरपंच अर्जुन गोडसे, किसनराव गोडसे, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, सोमनाथ येवले, प्रताप काटकर, दिलीप मांडवे, तुषार सानप, लिलाधर पवार, अजय फडतरे, संगीता पवार, जावेद मणोरे, तुकाराम देवकर, अशोक बैले, आनंदा खुडे, अक्षय थोरवे, वैभव फडतरे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख