'तुमचं आमचं ठरलंय'ची आणखी एक टीम कार्यरत : प्रभाकर घार्गे

माण विधानसभा मतदारसंघात 'आमचं ठरलंय'चं घोडं गंगेत न्हाल्याने अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली.
'तुमचं आमचं ठरलंय'ची आणखी एक टीम कार्यरत : प्रभाकर घार्गे

दहिवडी : माण विधानसभा मतदारसंघात 'आमचं ठरलंय'चं घोडं गंगेत न्हाल्याने अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली.

यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी शेवटच्या दोन दिवसांत `तुमचं आमचं ठरलंय'ची आणखी एक टीम मतदारसंघात कार्यरत आहे. लवकरच ती आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून दिली.

विरोधकांनी आमचं ठरलंय फिस्कटल्याच्या व काहीजण आमच्या गळाला लागल्याच्या वावड्या उठवल्या. त्यामुळे माण मतदारसंघात काही दिवस संभ्रमाचे वातावरण होते. मात्र रविवारी पुर्वीपेक्षा अधिक ताकदीने सर्वांनी एकत्र येवून पत्रकार परिषद घेतली. 
आमचं नुसतं ठरलं नसून पक्कं ठरलंय याची ग्वाही सर्वांनी दिली. त्यामुळे 'आमचं ठरलंय'च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ही पत्रकार परिषद सुरु असतानाच माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी एक नवीन बाँब टाकला. ते म्हणाले 'आमचं ठरलंय' हे पक्कं झालं आहे. मात्र या व्यतिरिक्त माण मतदारसंघात 'तुमचं आमचं ठरलंय'ची एक टीम कार्यरत आहे. लवकरच ती आमच्यासोबत येणार असून शेवटच्या काही दिवसात पत्रकार परिषद घेवून त्याची माहिती देण्यात येईल.

श्री. घार्गे यांच्या या बाँबगोळ्याने विरोधकांच्या गोटात खळबळ माजली असून नक्की घार्गे काय गौप्यस्फोट करणार या चर्चेने जोर धरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com