Prabhakar deshmukh gets 900 rupees from an old lady | Sarkarnama

प्रभाकर देशमुखांना आजीबाईने खर्चासाठी दिले नऊशे रुपये

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

सातारा : माण खटाव मतदारसंघात चरशीची आणि अटीतटीची लढत होत आहे. मते मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांचे जल्लोष्यात स्वागत प्रत्येक गावात होता आहे.  

अशातच सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार प्रभाकर देशमुख यांना प्रचारावेळी वेगळाच अनुभव आला. किरकसाल मध्ये एका आजीने आपल्या निवृत्ती वेतनातून नऊशे रुपये निवडणूक खर्चासाठी श्री. देशमुख यांना दिले.  या आजीने दिलेली ही मदत पाहून मात्र, देशमुख भारावून गेले.

माण खटाव विधानसभा मतदारसंघात गोरे बंधू विरोधात सर्वपक्षीय आघाडीचे प्रभाकर देशमुख अशी लढत होत आहे. तीनही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. चरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रत्येक उमेदवार जास्तीच जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभाकर देशमुख यांनी गावागावात जाऊन थेट संपर्कावर भर दिला आहे.  

आज किरकसाल येथे प्रचारादरम्यान गावातील वयोवृद्ध आजींने त्यांना   900 रुपये निवडणुकीसाठी दिले. हे पैसे त्या आजीने पेन्शन मधून दिल्याचे सांगितले. तसेच गावचे उपसरपंच धर्मराज अवघडे आणि प्रभाकर काटकर यांनी प्रत्येकी 500 रुपये निवडणूक खर्चासाठी श्री. देशमुख यांना दिले. लोकांकडून मिळत असलेले प्रेम आणि प्रतिसादामुळे श्री. देशमुख भारावून गेले. यावर प्रभाकर देशमुख म्हणाले,  मी आपल्या सर्वांना एवढाच शब्द देतो की येणारे पाच वर्ष हे फक्त मी तुमच्यासाठी देणार आहे.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख