Power tussle in Pune | Sarkarnama

पुणे झेडपीतील पदांसाठी नेत्यांत रस्सीखेच 

सरकारनामा वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे:  पुणे जिल्हा परिषदेचे नवे कारभारी कोण, याचा फैसला आज  होणार आहे. नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मंगळवारी (ता. 21) निवडले जाणार आहेत. सोमवारी दुपारी चार वाजता या दोन्ही पदांसाठीची नावे निश्‍चित करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सरकारी बंगल्यात या मुलाखती होणार आहेत. नेत्यांच्या नातेवाइकांनी ही पदे मिळविण्यासाठी फिल्डींग लावल्याने तो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे आदी नेते या मुलाखती घेणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद "ओबीसी'साठी राखीव आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सुमारे डझनभर सदस्य या पदासाठी पात्र आहेत. त्यापैकी आठ जण "ओबीसी'साठी राखीव असलेल्या गटातून निवडून आले आहेत. उर्वरित चौघे खुल्या गटातून निवडून आले आहेत. 

"ओबीसी'तील नव्या चेहऱ्यांपैकी चार सदस्यांच्या गटातील गणात पंचायत समितीचे सभापतिपद देण्यात आले आहे. त्यामुळे या चौघांचा पत्ता कट झाला आहे. उर्वरित आठपैकी तीनच नावे सध्या चर्चेत असून त्यात पांडुरंग पवार (जुन्नर), रोहित पवार, विश्‍वास देवकाते (दोघेही बारामती) यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदासाठी माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, वीरधवल जगदाळे (दौंड), माजी सभापती दशरथ माने यांचे चिरंजीव प्रवीण माने (इंदापूर) आणि दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील (आंबेगाव) यांची नावे चर्चेत आहेत. पांडुरंग पवार यांच्यासाठी अतुल बेनके आग्रही आहेत. अजित पवार यांचे पुतणे रोहीत यांना पदार्पणातच पदावर काम करण्याची संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. 

पुणे जिल्हा परिषदेत सलग चौथ्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत आला आहे. या वेळी या पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा नवा कारभारी कोण, याचा अंतिम निर्णय अजित पवार हेच घेणार आहेत. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे पक्षाचे नवनिर्वाचित 44 सदस्य, पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले दोन अपक्ष सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवर आलेल्या सर्व पंचायत समित्यांचे नवे सभापती आणि प्रत्येक तालुक्‍यातील पक्षाचे वरिष्ठ नेते आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय जिल्हा परिषदेचे मावळते पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख