भाजप काम करते, कॉंग्रेस फक्त घोटाळे करते : आर. के. सिंग

''येत्या रविवारी जगातील सर्वाधिक उंच असलेल्या लडाख, कारगील टोकावर वीज पोचणार आहे. त्यामुळे मार्चपासून हा देश भारनियमनमुक्त होणार असून, एप्रिलपासून देशात कोणत्याही वीज वितरण कंपनीने भारनियमन केलेच, तर त्याचा भुर्दंड संबंधित वीज कंपनीकडून वसूल केला जाईल. आम्ही काम करतो. कॉंग्रेस फक्त घोटाळे करते," असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी येथे केले.
भाजप काम करते, कॉंग्रेस फक्त घोटाळे करते : आर. के. सिंग

नाशिक :  ''येत्या रविवारी जगातील सर्वाधिक उंच असलेल्या लडाख, कारगील टोकावर वीज पोचणार आहे. त्यामुळे मार्चपासून हा देश भारनियमनमुक्त होणार असून, एप्रिलपासून देशात कोणत्याही वीज वितरण कंपनीने भारनियमन केलेच, तर त्याचा भुर्दंड संबंधित वीज कंपनीकडून वसूल केला जाईल. आम्ही काम करतो. कॉंग्रेस फक्त घोटाळे करते," असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी येथे केले.

शिलापूर शिवारात सुरू केलेल्या केंद्रीय ऊर्जा संशोधन व चाचणी प्रकल्पाचे भूमिपूजन सिंग यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या पावणेपाच वर्षांत सरकारने ऊर्जा क्षेत्रात अतिशय दमदार कामगिरी केली आहे. एक देश एक ग्रीड योजनेमुळे काश्‍मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही राज्यातून कुठल्याही राज्यात वीज नेणे शक्‍य झाले आहे.

देशात पावणेपाच वर्षांत एक लाख मेगावॉट वीजनिर्मिती वाढल्याचा दावा करीत सिंग म्हणाले, "बांगलादेश, नेपाळ, म्यानमारला विजेची निर्यात सुरू आहे. श्रीलंकेशी बोलणी सुरू आहे. देशात ९९ हजार ९८० सर्किट किलोमीटरचे जाळे एका ग्रीडला जोडल्याने कुठल्याही भागात वीज नेणे शक्‍य आहे. देशात १८ हजार ७०० गावांत वीज नव्हती. ९८७ दिवसांत या गावांत दोन कोटी ५५ लाख कुटुंबांपर्यंत वीज देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी राजस्थान आणि छत्तीसगडमधील चार जिल्ह्यांत अद्याप काम बाकी आहे. मार्चपर्यंत तेही पूर्ण करणार आहे." आम्ही राजकारण नाही, तर काम करतो. ७० वर्षांत कॉंग्रेसने घोटाळ्यांशिवाय काय केले? असा प्रश्‍न उपस्थित केला.

यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, प्रा. देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com