'त्या' 9 मिनीटांसाठी 'पॉवरग्रीड'ने जाहीर केला हायअॅलर्ट - Power Grid Announces High Alert on Fifth April | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

'त्या' 9 मिनीटांसाठी 'पॉवरग्रीड'ने जाहीर केला हायअॅलर्ट

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 एप्रिल 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊला विजेचे दिवे बंद करून लोकांनी नऊ मिनिटांसाठी दिवे किंवा मेणबत्त्या पेटवाव्यात, असे आवाहन केले आहे. त्यामुळे देशभरातूल 'ग्रीड'वर व्होल्टेजचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्रिडवर ताण येणार असल्याने पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडियाने या कालावधीसाठी 'हाय अॅलर्ट' जाहीर केला आहे

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊला विजेचे दिवे बंद करून लोकांनी नऊ मिनिटांसाठी दिवे किंवा मेणबत्त्या पेटवाव्यात, असे आवाहन केले आहे. त्यामुळे देशभरातूल 'ग्रीड'वर व्होल्टेजचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्रिडवर ताण येणार असल्याने पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडियाने या कालावधीसाठी 'हाय अॅलर्ट' जाहीर केला आहे. त्यासाठी सर्व संबंधींतांना कार्यस्थळावर हजर राहून दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशातील सर्व राज्य वीज मंडळांनीही या स्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

यासंदर्भात 'पॉवरग्रीड'चे कार्यपालक निर्देशक आर. के. अरोरा यांनी अंतर्गत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार या नऊ मिनीटांत वीज वाहकांवर अचानक ताण येईल. त्यामुळे संबंधीत यंत्रणांनी सज्ज रहावे. सर्व प्रमुखांनी आपल्या कार्यालयात हजर रहावे. स्थितीशी सामना करण्यासाठी पुर्वतयारी करावी यांसह विविध सुचना केल्या आहेत.

हे देखिल वाचा - मोंदींच्या घोषणेने वीज अभियंत्यांना फुटलाय घाम

यासंदर्भात 'सरकारनामा'ने यापूर्वीच वृत्त प्रकाशीत केले आहे. त्यानुसार या काळात उणे अथवा कमी वेळेत मोठ्या प्रमाणात फ्रिक्वेन्सी कमी-जास्त होऊन ग्रिड फेल होण्याची शक्‍यता अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशभरातील वीजनिर्मिती करणारे अभियंते व लोड डिस्पॅच सेंटरवर काम करणारे अभियंते चिंतेत पडले आहेत. या नऊ मिनिटांच्या कालावधीत नियोजन कसे करायचे, या संदर्भात अभ्यास सुरू आहे. 

सर्व राज्यांमधील वीजवहन तारा एकाच नॅशनल ग्रिडला जोडण्यात आल्या आहेत. पूर्वी एका राज्यातील महत्त्वाच्या वीज केंद्राची वीजनिर्मिती शून्यावर आली, तर संपूर्ण राज्य काळोखात जात असे; परंतु आता देशातील सर्व ग्रिड एकत्र आल्याने असे प्रकार घडत नाहीत. मात्र, येत्या रविवारी फ्रिक्वेन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होऊन ग्रिड फेल्यूअर झाल्यास संपूर्ण देश काळोखात जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी देशभरातील सर्व वीजनिर्मिती केंद्रे व लोड डिस्पॅच सेंटर यांना युद्धपातळीवर तयारी सुरु झाली आहे.

मागणी-पुरवठा हा वितरण व लोड डिस्पॅचशी संबंधित विषय आहे. मी एक अभियंता म्हणून एवढेच सांगू इच्छितो, की यंत्रणा सतर्क आहे. गरज पडल्यास जलविद्युत व अणुऊर्जा केंद्र प्रथम सुरू करून, वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. राज्य वा देश अंधारात जाण्याची शक्‍यता नाही. कारण पूर्वतयारी सुरू आहे - महेश आफळे, जनसंपर्क अधिकारी, महानिर्मिती

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख