वीज कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ : चद्रशेखर बावनकुळे 

वीज कंपन्यांमध्ये पुनर्रचना करताना पदे कमी करण्यात येणार नाहीत.
Bawankule-&-power
Bawankule-&-power

कोराडी : " वीज कंपन्यांमध्ये पुनर्रचना करताना पदे कमी करण्यात येणार नाहीत.  तिन्ही वीज कंपन्या आर्थिकदृष्ट्‌या सक्षम झाल्या पाहिजेत. वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांची पगारवाढ विधानसभा निवडणुकीपूर्वी केली जाईल ," असे  आश्वासन  उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या 42 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. नागपूर येथील आमदार निवासात झालेल्या या अधिवेशनात महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, महापारेषणचे कार्यकारी संचालक सुगत गमरे, कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे, महापारेषणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश पाटील, म.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तळणीकर, दिलीप शिंदे, प्रवीण बागुल उपस्थित होते.

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांत भरती, बदली, बढती विषयाला हात घालीत पुनर्रचनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पदे कमी होण्याची शक्‍यता आहे. वरिष्ठ व्यवस्थापक(मानव संसाधन) यांना वरिष्ठ व्यवस्थापक(वित्त व लेखा) समकक्ष वेतनश्रेणी मिळावी , जनसंपर्क संवर्गाचे अपग्रेडेशन, स्टेट्‌स व मनुष्यबळ, औद्योगिक संबंध संवर्ग, माहिती तंत्रज्ञान संवर्ग, विधी संवर्ग व सुरक्षा संवर्गाच्या अधिकाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने अधिकारी संघटनेने प्रस्ताव दिला असल्याचे यावेळी बावनकुळे यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संमेलनाला विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी, महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीतील कार्यरत वित्त व लेखा, महसूल, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, जनसंपर्क, सुरक्षा व अंमलबजावणी आणि विधी विभागाचे राज्यभरातील सुमारे 400 वीज अधिकारी ह्या अधिवेशनाला उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com